Ahmednagar News

Ahmednagar News : स्पर्धा परीक्षेची शारीरिक चाचणी यशस्वी व्हावी, यासाठी मैदानावर धावण्याचा सराव करत असताना विवाहितेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला..

Ahmednagar News : स्पर्धा परीक्षेची शारीरिक चाचणी यशस्वी व्हावी, यासाठी मैदानावर धावण्याचा सराव करत असताना विवाहितेला अचानक हृदयविकाराने तिचा मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी चंदनापूरी येथे घडली आहे याबाबतची सविस्तर बातमी अशी कि संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी येथे राहणाऱ्या मनीषा दीपक कढणे (वय २५) या वन निरीक्षक पदाची परीक्षा लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.

पुढील आठवड्यात त्यांची शारीरिक चाचणी परीक्षा होती. यासाठी त्या धावण्याचा सराव करीत होत्या . शहरातील एका अकॅडमी अंतर्गत कढणे यांचा सराव सुरू असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

मनीषा यांच्या अश्या अचानक जाण्याने सर्वाना धक्का बसला आहे.. तालुक्यातील चंदनापूरी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर विवाहितेच्या मागे लहान मुलगा, पती, सासू, सासरे, असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *