सुदर्शन कोतकर

नेवासा | अभिषेक गाडेकर – नेवासा येथील ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित कुस्त्यांच्या हंगाम्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या हंगाम्यात शेकडो मल्लांनी सहभाग नोंदवला.यावेळी एक नंबरच्या झालेल्या कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुदर्शन कोतकर ने सेनादलाचा संग्राम पाटील याला मानेवरती घुटना ठेवून तब्बल अर्धा तासानंतर चितपट केल्याने सुदर्शन कोतकर हा ज्ञानमोहिनी केसरी चा मानकरी ठरला.यावेळी कोतकर यांना मानाची गदा प्रदान करण्यात आली.दोन नंबरच्या कुस्तीमध्ये संभाजी राजे कुस्ती केंद्र नगरचा पैलवान युवराज चव्हाण यानी सेनादलाच्या अनिरुद्ध पाटील याला चितपट केले.तर तीन नंबरच्या कुस्तीसाठी त्रिमूर्ती कुस्ती केंद्राचा पैलवान योगेश चंदेल याने भारत माता व्यायाम शाळा हर्सूल संभाजीनगरच्या अर्जुन बागडे ला चितपट केले.

चार नंबरच्या कुस्तीसाठी हनुमान आखाडा उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान सागर कोल्हे याने शिवराम दादा कुस्ती केंद्र पुणे चा पैलवान सुनील नवले याला चिटपट केले. पाच नंबरच्या कुस्तीसाठी त्रिमूर्ती कुस्ती केंद्राचा पैलवान युवराज खोपडे याने राष्ट्रीय कुस्ती संकुल वडकी पुणे चा पैलवान ऋतिक इगवे याला चिटपट केले.सहा नंबरच्या कुस्तीमध्ये गोकुळ वस्ताद तालमीचा पैलवान अक्षय कावरे याने भारत माता व्यायाम शाळा हर्सूल चा पैलवान राहुल पाडळे  याला चिटपट केले.सात नंबरच्या कुस्तीमध्ये शिवछत्रपती कुस्ती संकुल करमाळा चा पैलवान अमोल नरोटे याने त्रिमूर्ती कुस्ती केंद्राच्या पैलवान रोहित आजबे याला चीतपट केले. आठ नंबरच्या कुस्तीमध्ये त्रिमूर्ती कुस्ती केंद्राचा पैलवान शुभम जाधव याने शिवछत्रपती कुस्ती संकुल करमाळा येथील पैलवान लतेश टकले याला चितपट केले. नऊ नंबरची कुस्ती श्रीराम कुस्ती केंद्र बुऱ्हानगर पैलवान सौरभ मराठे व संभाजी राजे कुस्ती संकुलनाचा पैलवान लक्ष्मण धनगर यांच्यात झाली कुस्ती बराच वेळ चालल्यामुळे बरोबरत सोडावी लागली.


दहा नंबरच्या कुस्तीमध्ये त्रिमूर्ती कुस्ती केंद्राच्या पैलवान अंजली लोंढे हिने आर्या शिंदे हिला चितपट केले. अकरा नंबरच्या कुस्तीमध्ये त्रिमूर्ती कुस्ती केंद्राच्या पैलवान प्राची अंभोरे हिने सायली खरात हीला चितपट केले. याचबरोबर इतर शंभरहून अधिक जास्त कुस्त्या मैदानामध्ये जोडल्या होत्या सर्व पैलवानांना भरघोस असे बक्षीसे देण्यात आली. पंच म्हणून राष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. संभाजी निकाळजे,प्रा.मास्टर सुरेश लव्हाटे सर,पैलवान संदीप कर्डिले यांनी काम पाहिले तर प्राध्यापक मंगेशवर धायगुडे यांनी उत्कृष्ट समालोचनाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले.विजेता सुदर्शन कोतकर यास मानाची गदा व  ज्ञानमोहिनी किताब देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,संजय सुखदान,माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, अनिल शिंदे,जयंत मापारी, दीपक धोत्रे,पंच संभाजी निकाळजे,मास्टर सुरेश लव्हाटे,यात्रा कमिटीचे राजेंद्र मापारी,जालिंदर गवळी उपस्थित होते.ज्ञानमोहिनी केसरी कुस्ती हगाम्याचे प्रमुख मार्गदर्शक संजयनाना सुखदान यांनी उपस्थित हजारो प्रेक्षकांचे आभार मानले तर कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल उपस्थित प्रेक्षकांनी यात्रा कमिटीचे कौतुक करत धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *