विठ्ठल कांगणे

नेवासा | सुधीर चव्हाण – युवा प्रबोधनकार व व्याख्याते प्रा.विठ्ठल कांगणे सरांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाला नेवासा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जगापेक्षा वेगळे करण्यासाठी जगाला काय लागते ते शोधण्यासाठी प्रयत्न करा युवा पिढीने प्रयत्न करावा असे आवाहन प्रा.विठ्ठल कांगणे सर यांनी यावेळी झालेल्या व्याख्यानात बोलताना केले. नेवासा येथील मराठा बोर्डिंग प्रांगणात श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त झालेल्या व्याख्यान प्रसंगी बोलतांना प्रा.कांगणे सर म्हणाले की मुलींमुलांना संस्कार जतन करणे ही काळाची गरज असून मुलींना कपडे घेतांना ते तोकडे असे नसेल ना याची काळजी घेणे गरजेचे आहे,

सृष्टीला पहायचा असायचे तर दृष्टी बदला,यामुळे याआधी घटना घडल्या त्या घडल्या नसत्या,आज ज्ञान मंदिरातूनच कलेक्टर निर्माण होतील अशी ज्ञान मंदिरे ही टिकली पाहिजे,यासाठी पोरींनो बापाच्या सन्मानासाठी काहीतरी करा,त्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा त्यासाठी ध्येय निश्चित करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

जीवनाच्या उत्कर्षासाठी शिक्षण हे गरजेचे आहे, शिक्षणाची संधी न मिळाल्यास वाईट दिवस येणार आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली व यासाठी भव्य दिव्यता दाखवण्याची गरज असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. ऐऱ्यागैऱ्या भिकारचोट बरोबर राहून आपले आयुष्य खर्च करू नका,चाळे करायला आपण जन्माला आलेलो नाही, आपलं आयुष्य यांच्यासाठी नाही,पुस्तकाने आपलं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करा,मुलींनो आपल्या घरात परिवर्तन सुरू करा त्यासाठी आईवडीलांचे दर्शन घ्या त्यांचा फोटो आपल्या पुस्तकावर लावा,मायबापांच्या सुखासाठी लढा असे आवाहन त्यांनी केले.

अंधश्रद्धा सोडा, कर्माने श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करा,नोकरी लागल्यावर गरिबाला शिक्षणासाठी मदत करा,भविष्याच्या लढाईत जिंकण्यासाठी सज्ज व्हा,खिशात पैशाचा खळखळाट असू द्या परंतु त्या पैशाला गरिबांचा तळतळाट नसावा, स्वतःसाठी वेळ द्या ,लोक तुमची वेळ विकत घेतील अशी वेळ येईल,अन्यायाच्या विरोधात लढाई करण्यासाठी राग आला पाहिजे,भवितव्य घडविण्यासाठी कष्ट घ्या,जे परिवर्तन व्हायचे ते होणारच आहे,त्यासाठी थोडा संयम ठेवा,मायबापांनी एकमेकांना सांभाळून घ्या,मुलांनो जिवंतपणी आई बापाला विचारा असे आवाहन त्यांनी केले.


नेवासा या भूमीत जसा माऊलींनी जगाचा विचार केला तसा विचार आपण ही करा,छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी दाखवलेला मानव धर्म टिकला पाहिजे त्यासाठी भुकेलेल्या जीवाला अन्न, तहानलेल्याला पाणी द्या हीच खरी भारतीय संस्कृती असून तिचे जतन करा,आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असा संदेश ही त्यांनी उपस्थित हजारो नागरिकांसमोर बोलतांना दिला. या व्याख्यानाने उपस्थित मंत्रमुग्ध तर झालेच परंतू आपल्या प्रखर विचाराने उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन ही घालण्याचा प्रयत्न या व्याख्यानाने झाला. प्रा.देविदास साळुंके यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *