अंगणवाडी

सलाबतपुर | अभिषेक गाडेकर – नेवासा तालुक्यातील पत्रकार म्हणून नाव लौकिक असलेले मंगेश निकम यांचे सुपुत्र चि.शिवांशराजे निकम यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्पना पत्रकार मंगेश निकम यांनी आखली. त्यामध्ये त्यांनी सामाजिक उपक्रम म्हणून आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस सलाबतपुर येथील अंगणवाडी क्रमांक :- २४२ हरिजन वस्ती सलाबतपुर यां अंगणवाडीला महापुरुषांचे फोटो फ्रेम भेट देऊन आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस बालगोपाळांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला.

यावेळी अंगणवाडीच्या मुलांना शिवांशराजे निकम यांच्या हस्ते चॉकलेट, बिस्कीटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी अंगणवाडी सेविका अनिता एकनाथ नगरे, अंगणवाडी मदतनीस समिंद्रा रूपचंद्र ताकावणे , तसेच मासूम भाई कादरी, शहानूर भाभी मासूम कादरी, तसेच शिवांश निकम यांचे आजोबा बाळासाहेब रावसाहेब निकम, आजी शोभा बाळासाहेब निकम, आई पल्लवी मंगेश निकम , वडील पत्रकार मंगेश बाळासाहेब निकम, तसेच मामा शंकर सदाशिव चव्हाण हे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *