शिवरात्री

नेवासा | अभिषेक गाडेकर तालुक्यातील तेलकुडगाव येथील जागृत देवस्थान चैतन्य नागनाथ महाराज यात्रेचे दि. 10 रविवार व 11सोमवार हे यात्रेचे मुख्य दोन दिवस आहेत. महाशिवरात्रीनिमित्त दि. 8 शुक्रवार रोजी सकाळी ८ ते ११ नागनाथ महाराज देवस्थानच्या प्रांगणात पवार महाराज यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर गावातील प्रगतशील शेतकरी जनार्धन रामचंद्र गटकळ प्रणव नवनाथ गटकळ सेवा सोसायटी चे चेअरमन अरुण भिवसेन घाडगेपाटील किशोर आप्पासाहेब काळे भाऊसाहेब बापू काळे किशोर भीमराज घोडेचोर बाळासाहेब घोडेचोर यांच्या वतीने खिचडीचा महाप्रसाद दिला जाणार आहे. दि. 8 मार्च रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज महाआरती होणार आहे, शनिवारी रोजी दुपारी ४ वा. पैठणकडे कावडी प्रस्थान होणार आहे.
महाशिवरात्री ऩतर येणाऱ्या अमावाष्याला यात्रेचा मुख्य दिवस असतो.

या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे यात्रेच्या मुख्य दिवशी छाबिण्यातील शोभेची दारू काम दि. 11 रोजी सोमवार रोजी कुस्त्यांचा जंगी हगामा असतो दि. रविवार दि 10 रोजी सकाळी ९ ते ११ वाजता कावडी मिरवणूक होऊन नागनाथ महाराज मूर्तीस कावडीधारकांकडून व ग्रामस्थांकडून गंगाजल स्नान होणार आहे. रात्री ८ ते १० छबिना मिरवणूक शोभेची दारू आतिषबाजी होणार असून रात्री ९ वाजता लोकनाट्य विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा विना तिकीट तमाशा आयोजित करण्यात आला आहे. दि. 11 सोमवार रोजी सकाळी ८ वाजता हनुमान मंदिरासमोर हजेरीचा कार्यक्रम होऊन दुपारी तीन वाजता जंगी कुस्त्यांचा हागमा होईल तरी मिठाई दुकानदार स्टेशनरी दुकानदार कसरत कलाकार यांनी यात्रा प्रसंगी आप-आपली हजेरी लाऊन यात्रेची शोभा वाढवण्याची यात्रा कमिटी अध्यक्ष सरपंच रंजना बालकनाथ काळे यांनी आवाहन केले आहे.

यात्रा कमिटीमध्ये यात्रा नियोजन उपसरपंच अशोक काळे, ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे, सुरेश काळे, शरद काळे, एकनाथ घोडेचोर, महेश गटकळ,नामदेव घोडेचोर भारत काळे नारायण काळे, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिन्द्र म्हस्के माजी सरपंच गोरक्षनाथ घोडेचोर कामगार पोलीस पाटील शिवाजी घोडेचोर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव काळे, सेवा संस्थेचे चेअरमन काकासाहेब काळे काकासाहेब घोडेचोर ज्ञानेश्वर काळे, मा.सरपंच रेवन्नाथ काळे, मालोजी गटकळ, छानदेव घोडेचोर, सुर्यभान घोडेचोर, बाप्पू गटकळ, विकास काळे राजमाता जिजाऊ प्रतिष्टानचे अध्यक्ष दीपक काळे, प्रगतशील शेतकरी साईनाथ काळे,

मच्छिंद्र काळे, हनुमंत गटकळ, शिवाजी घोडेचोर, पोपट सरोदे, माजी तंटामुक्त अध्यक्ष श्रीकृष्ण घाडगे,पत्रकार गणेश घाडगे अर्जुन गायकवाड, मोहन शेटे, दत्तात्रय गटकळ, शेटे स़भाजी, युवा सेवा संस्थेचे अध्यक्ष अरुणपाटील घाडगे, सुनील राजहंस, कांतीलाल काळे, बाळासाहेब काळे, रविंद्र काळे, म्हस्के नामदेव, संभाजी घोडेचोर, रमेश काळे, महेश काळे, दहिघन गटकळ, दिपक घाडगे,बंडू घोडेचोर आदि परिश्रम घेत आहेत यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने पाणी वीज जागेची व्यवस्था करण्यात आली आहे.

2 thoughts on “तेलकुडगावच्या चैतन्य नागनाथ महाराजांच्या यात्रेचा शिवरात्रीला प्रारंभ..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *