क्रिकेट

गणेशवाडी | गणेश बेल्हेकर नेवासा तालुक्यातील सोनई जवळील मुळा कारखाना येथे नाथपंथीय डवरी गोसावी टेनिस बॉल दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर या क्रीडा स्पर्धा दि. १८ मार्च व १९ मार्च या कालावधीत भरवण्यात आलेल्या आहेत.

या स्पर्धेत रुपये २१,१११ प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक१५,१११रुपये,त्रुतीय पारितोषिक ११,१११रुपये . उदयनदादा गडाख यांचे हस्ते टाॅच करून या स्पर्धेस सुरुवात करण्यात आली.स्पर्धेचे हे अकरावे वर्ष आहे. या वेळी आयोजक बाबा शिंदे, मोहन शेगर, विठ्ठल शेगर, बाबाजी शेगर, अगीनाथ शेगर, सागर शिंदे, विजय शिंदे, संतोष चौगुले सह नाथपंथी डवरी गोसावी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी परिसरातील अनेक नामवंत संघाने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *