गडाख

जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांचा गडाख गटात प्रवेश..

नेवासा | राहुल राजळे – भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व कायम निमंत्रित सदस्य दत्तत्रय काळे यांनी भाजपच्या सर्व पदाचा त्याग करत भेंडा बु येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख गटात जाहीर प्रवेश केला आहे . नेवासा तालुक्यात भाजपाची तोफ समजणाऱ्या काळे यांनी गडाख गटात प्रवेश केल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व विठ्ठलराव लंघे हे मोठ्या राजकीय अडचणीत सापडले असून गडाख यांच्यासाठी आगामी राजकारणाला मोठे बळ मिळाले आहे . दत्तात्रय काळे जीप सदस्य भेंडा बु,भेंडा बु उपसरपंच पंढरीनाथ फुलारी, देवगावचे सरपंच विष्णू गायकवाड,देवगावचे ग्राम प सदस्य देवेंद्र काळे, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, महेश गायकवाड, गणेश गायकवाड,सरपंच सोपानराव लोखंडे रांजणगाव देवी,तुकाराम दामोदर कोलते शहापुर यांनी प्रवेश केला आहे.

राज्यात तसेच देशात अनेक पुढारी भाजप मधे जात असताना नेवासा तालुक्यात मात्र अनेकांनी भाजप सोडली आहे व त्यानी जाहीरपणे माजी आमदारावर टीकेची झोड उठवली आहे . खुपटी , शिंगवेतुकाई , नेवासा बुद्रुक , भानासहिवरे ,
शनिशिंगणापूर , कुकानासह अनेक निष्ठावान भाजपचे लोक गडाख गटात सामील झाले आहे . एकाच वेळी भेंडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य,देवगावचे सरपंच व रांजणगावदेवीचे सरपंच,भेंडा बु उपसरपंच यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत गडाख गटात प्रवेश केल्याने नेवासा तालुक्यातील भाजपात स्थानिक नेतृत्वाविरोधात तीव्र नाराजी दिसून येत आहे. जिल्हा परिषद सदस्य काळे यांचा भेंडा , कुकाना ,चांदा गटात मोठा लोकसंपर्क आहे . माजी आमदार मुरकुटे यांच्या गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हनुन निवडून आले होते . २०१४ व २०१९ च्या विधानसभेला काळे यांनी मोठी भूमिका बजावली होती . काळे यांच्या प्रवेशाने गडाख यांची अगोदरच चांगली असलेली राजकीय परिस्थीती भक्कम झाली आहे .

गडाख जोमात विरोधक कोमात-
आमदार शंकरराव गडाख सध्या तालुका पिंजून काढत आहे . जनतेच्या भेटी गाठी घेत आहे . त्यांच्या प्रयत्नातून शासकीय निधीतून विविध गावात सभा मंडप होत आहे . विधानसभेची गडाखानी आतापासूनच तयारी चालू केली आहे याउलट मुरकुटे याना लोक सोडून जात आहे . त्यांची खूप जवळची माणसे गडाख गटात गेली आहे . विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गडाख यांची भक्कम परिस्थिती आहे तरीही आमदार गडाख यांनी डायरेक्ट जनतेच्या दारात जाण्याची मोहीम हाती घेतली आहे .

नेवासा भाजप मधे सध्या तीन गट असल्याचे दिसत आहे . भाजप तालुका अध्यक्ष माजी आमदार गटाचे असून जुने व निष्ठावान कार्यकर्ते पत्रकार परिषद घेत आहे . लढणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी फक्त पाहुणे रावळे यांचा विचार केला जातो असा जाहीर आरोप केला जात आहे . देशात व राज्यात अनेक लोक भाजप मधे जात असून नेवासा तालुक्यात लोक भाजप कुणामुळे सोडून जात आहे हे आता उघड गुपित आहे .

2 thoughts on “नेवाशात लंघे , मुरकुटे यांना मोठा धक्का…भाजपाची तोफ आ गडाख यांच्या ताफ्यात..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *