पुरस्कार

नेवासा | अभिषेक गाडेकर तालुक्यातील मक्तापूर येथील मराठा सुकाणु समितीचे प्रदेशाध्यक्ष शिवसेना (ठाकरे गट) शाखाप्रमुख गणेश झगरे यांना शिर्डी येथे साई अर्पण फाउंडेशन च्या वतीने समाजभूषण पुरस्कार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणाच्या भाषणात वाकचौरे म्हणाले की शिवसेनेचे कट्टर समर्थक गेल्या पंधरा वर्षापासून हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान कार्यकर्ता मक्तापुर शिवसेना शाखाप्रमुख व मराठा सुकाणु समिती चे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

त्यामुळे या सच्च्या शिवसैनिकाच्या कामाची दखल घेऊन त्यांना साई अर्पण फाउंडेशन च्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. मा.खा.भाऊसाहेब वाकचौरे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, बाळासाहेब सोनवणे, अंजली सोनवणे यांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला. मुक्तापूर चे सरपंच अनिल लहारे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय कांगुणे, मनोज झगरे, सागर सरोदे, दीपक बर्डे, सुभाष चव्हाण, गोरक्षनाथ नवघरे, शकुर इनामदार, सचिन गायकवाड, योगेश गायकवाड आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *