क्रिकेट

सोनई | राहुल राजळे – “नामदार चषक २०२४” टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्रामाचा महामुकाबला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तालुक्यातील तरुण खेळाडूंना जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या हेतूने स्पर्धेचे आयोजन केले होते. गेल्या आठ दिवसांपासून मुळा साखर कारखाण्याच्या प्रांगणात चालू असलेल्या सोळा संघातील रंगतदार सामने पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५१०००/- चा मानकरी जयहिंद चांदा, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ३१०००/- चा मानकरी माता वैष्णवी बेल्हेकरवाडी हा संघ ठरला तसेच, तृतीय पारितोषिक २१०००/- चा मानकरी रॉकस्टार नेवासा, चतुर्थ पारितोषिक १५०००/- चा मानकरी पसायदान नेवासा संघ ठरला.

नामदार चषकाचा मालिकावीर अमन शेख याने मिळवला तर अंतिम सामन्याचा सामनावीर पोपट खरपुडे हा राहिला तर उत्कृष्ट फलंदाज समीर शहा तर उत्कृष्ट गोलंदाज महेश घागरे ठरला. सर्व विजेत्या संघांना व खेळाडूंना युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व आयोजक कमिटी, समालोचक, पंच यांनी अतिशय मेहनत घेत आपली जबाबदारी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली. हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच युट्यूब लाईव्हद्वारे हे अनेकांनी सामने पाहण्याचा आनंद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *