महिला दिन

घोडेगाव – गुरुवार दि. ७ मार्च २०२४ रोजी घोडेगाव येथील ज्ञानमाऊली इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिन साजरा करण्या मागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महिलांचा दर्जा आणि प्रतिष्ठा याविषयी जागरुकता निर्माण करणे हा होता. पृथ्वीराज चव्हाण, शालोमन साळवी व सत्यजित होंडे या विद्यार्थ्यांनी महिलांवर भाषणे दिली या भाषणातून मदर तेरेसा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँसाहेब, डॉ. किरण बेदी, अहिल्याबाई होळकर, रमाई आंबेडकर, सिंधूताई सपकाळ या थोर व्यक्तींच्या योगदानाबद्दल सांगितले.

एलकेजी, युकेजी, दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी या वेळी सुंदरसे नृत्य सादर केले. शाळेच्या प्रिन्सिपल सि. क्विनीटा डिसोझा यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि जगभरातील महिलांचे अमूल्य योगदान आणि प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या अदम्य शक्तीचे कौतुक केले. त्यांनी प्रत्येक स्त्रीला दिलेले संरक्षण आणि काळजी यासाठी पुरुषांचे कौतुकही केले, जे खूप महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेच्या सेक्रेटरी सि. निलमनी, सि. रफिला, सि. लीना, सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवीतील सार्थक झाडे व आर्यन शिरसाठ यांनी केले तर नियोजन आयोजन बारगळ सर व खरात मॅडम यांनी केले तर छायाचित्रण लोंढे सर व पटेकर सर यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार प्रिन्सिपल सि. क्विनीटा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *