सुप्रिया झिंजुर्डे

मुकिंदपूर | राजेंद्र वाघमारे : आपल्या स्वकर्तृत्वातून समाजात एक वेगळा ठसा उमटविणाऱ्या नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील आदर्श शिक्षिका सुप्रिया सुरेश झिंजुर्डे यांचे नुकतेच आकस्मित निधन झाल्यामुळे शिक्षण क्षेञात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर नेवासा तालुक्यातील शिक्षकवृंद तसेच सामाजिक – राजकिय व धार्मिक क्षेञातील मान्यवरांना मोठा धक्का बसलेला आहे त्यांनी शैक्षणिक जीवनात आपल्या शाळेतील गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धा आणि वाचन संसकृतीचे धडे देत उत्तम कार्य केलेले आहे.

त्यांच्या वर्गातील चिमुकले विद्यार्थी हुशार बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे एक आदर्श शिक्षिका व कवियिञी असलेल्या सुप्रिया झिंजुर्डे यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त समजताच अनेक शिक्षकांना आश्रू अनावर झालेले होते त्या एक उत्तम खेळाडू होत्या त्यांनी आपल्या जिवनात जगतांना सामाजिक व धार्मिक उपक्रमांना हजेरी लावत समाजात स्वकर्तृत्वातून जिद्दीच्या जोरावर एक वेगळा ठसा उमटवत अशक्यबाबी आपल्या कर्तृत्वातून शक्य करुन दाखविल्यामुळे त्यांच्या जीवनकार्यामुळे अनेकांना त्यांच्या निधनाचा मोठा धक्का बसलेला असून त्यांच्या अंत्यविधी निमित्त अनेक शिक्षक व शिक्षिकांनी टाहो फोडत आश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

त्यांचे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर प्रंचड प्रेम आणि आपुलकी असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी विद्यार्थीही उपस्थित राहून आपल्या एका आवडत्या आणि लाडक्या शिक्षिका अनंतातविलीन झाल्यामुळे विद्यार्थ्यांनाही आश्रू अनावर झालेले होते त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी अनेक सामाजिक – शैक्षणिक व धार्मिक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या जीवनकार्याचा गुणगौरव करत होता त्यांचा अशा या हरहुन्नेरी व्यक्तीमत्व असलेल्या शिक्षिका सुप्रिया झिंजुर्डे यांचा दशक्रियाविधी कायगांव टोका रामेश्वर मंदिर येथे रविवार (दि.१०) रोजी सकाळी ८ वाजता होणार असून परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच प्रार्थना

2 thoughts on “आदर्श शिक्षिका सुप्रिया झिंजुर्डे यांच्या निधनाने शिक्षण क्षेञ सुन्न!”
  1. […] जीवंत व्यक्तींच्या मृत्युचे खोटे दाखले तयार करुन ६ एकर बागायती जमिनीचा केला व्यवहार ; नेवासा तालुक्यातील संतापजनक प्रकार आदर्श शिक्षिका सुप्रिया झिंजुर्डे या… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *