दिव्यांग

नेवासा | सुधीर चव्हाण – दिव्यांगाना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय योजनेचा लाभ द्या अशी मागणी बहुजन दिव्यांग(अपंग)क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली होती याबाबत प्रशासनाने मागणीची दखल घेत दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा देण्याचे मान्य केले असून आता सदर योजनेचा लाभ दिव्यांगांना मिळणार असल्याची माहिती दिव्यांग क्रांती सेनेचे संस्थापक अमित जेधे यांनी दिली.

यावेळी बोलताना अमित जेधे म्हणाले की  दिव्यांगाना अंत्योदय योजनेतील ३५ किलो धान्याचा लाभ मिळावा म्हणून ग्रामीण भागाकरिता ४४ हजार इतके तर शहरी भागाकरिता ५९ हजार इतकी उत्पन्न मर्यादा आहे आमच्या संघटनेतील सर्व दिव्यांगाची उत्पन्न मर्यादा ही ४४ हजाराच्या आत असल्याने या सर्व दिव्यांगाना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय योजनेचा लाभ दयावा अशी मागणी आम्ही केली होती.

सदर मागणीची दखल प्रशासनाने न घेतल्यास दि.१२ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार होते मात्र तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांनी वरील मागणी बाबत चिकित्सा करून सदरची मागणी योग्य असल्याचे सांगत दिव्यांगांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभ दिला जाईल असे लेखी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात येऊन प्रशासनाला धन्यवाद देत आभार मानण्यात आले. सदर निवेदन प्राप्त झाल्यानंतर नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांनी याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या त्यानंतर जिल्हाधिकारी अहमदनगर,पुरवठा विभाग नेवासा, तहसीलदार नेवासा
यांनी मागणीची दखल घेत अंत्योदय योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. यावेळी बहुजन दिव्यांग क्रांती सेनेचे संस्थापक अमित जेधे,रामभाऊ केंदळे,अशोक पाटोळे,गणी पठाण, मोहिनीराज बडवे,रहीम शेख यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *