पारायण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी तुकाराम महाराज बिज निमित्ताने दि.२० मार्च ते २७ मार्च या कालावधीत सामुदायिक गाथा पारायण व संगीत रामायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे ३५ वे वर्ष आहे. दि. २७ रोजी सकाळी संत महंताच्या उपस्थित ध्वज पुजा होऊन या सप्ताहाची सुरुवात होईल ह.भ.प.देविदास महाराज आडभाई यांच्या सुश्राव्य वाणीतून रोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत संगीत रामायण कथा होईल.

कार्यक्रमात रोज पहाटे ४ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ११ सामुदायिक गाथा पारायण, दुपारी २ते ३ गाथा भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ७ ते संगीत रामायण कथा होईल. दि. २७ मार्च रोजी सकाळी ७ ते ९ भव्य ग्रंथ मिरवणूक होईल. नंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत ह. भ. प. देवीदास महाराज आडभाई यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाने या सप्ताहाची सांगता होईल. आडभाई महाराज यांना गायन साथ ह. भ. प प्रकाश महाराज वांढेकर व ह. भ. प. किशोर महाराज चव्हाण यांची तर संगीत साथ ह. भ. प. अनिल महाराज शेटे, ह. भ. प. गणेश महाराज थिटे तर तबलावादक ह. भ. प .शाम महाराज बारवेकर यांची राहील. तरी परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *