तस्मिया शेख

नेवासा | मंगेश निकम – कौशल्य विकास,रोजगार,उद्योजकता व नवीन्याता विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय नमो महारोजगार मेळाव्या मधे ठाणे,लातुर व इतर ठिकानी कंपनी व युवांमधे समन्वय साधत उल्लेखनीय कामगीरी केल्या बद्दल राज्याचे कौशल्य विकास,रोजगार,उद्योजकता व नवीन्यता विभाग मंत्री मा.मंगलप्रसाद लोढा व राज्य आयुक्त निधी चौधरी ,सहआयुक्त डी.डी. पवार साहेब तसेच आमदार निरंजन डावखरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितित सन्मान चिन्ह देत गौरव करण्यात आला.

तस्मिया शेख यांचे रोजगारावर गेले १० वर्षा पासुन कार्य सूरू असुन विविध राजकीय पक्ष तसेच संघटना,सामाजिक संस्था व पोलिस प्रसाशन यांच्या मध्यमातुन महाराष्ट्र,गुजरात,गोवा,कर्नाटक आशा विविध ठिकानी आता पर्यंत ३००पेक्षा अधिक नौकरी मेळावे आयोजित करत लाखों बेरोंजगारांना रोजगार मीळऊन देन्या करिता त्या नेहमीच अग्रेसर राहील्या आहेत.तस्मिया या जॉब फेअर इंडिया,तस्मी स्किन,बेकवाल केक, आशा विविध कंपन्याच्या संस्थापीका असुन उद्योग क्षेत्रात त्यांची उत्तम कामगीरी राहिली आहे.

या सन्माना बद्दल बोलत असताना शेख याँनी राज्याचे मुख्यंमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यंमंत्री अजीतदादा पवार साहेब व देवेंद्रजी फडवनीस साहेब यांचे आभार व्यक्त करत याचे सर्व श्रेय रोजगार मंत्री मंगलप्रसाद लोढा साहेब,राज्य आयुक्त निधी चौधरी ,सहआयुक्त डी.डी.पवार साहेब,सी.एम.ओ चे रजपुत साहेब,मंगेश देसाई सर व जॉब फेअर इंडिया टिम यांना जाते असे संबोधित केले.तस्मिया शेख या अहमदनगर येथिल नेवासा तालुका,कुकाणा येथिल असुन उद्योजक अब्दुल हाफिज शेख यांच्या त्या पत्नी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *