कन्यादान

नेवासा | मंगेश निकम – तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने गावातील मुलीच्या लग्नात संसार उपयोगी वस्तू खरेदीसाठी “कन्यादान” योजना सुरु केलेली आहे. या योजनेतून ग्रामनिधी मधून ५००० रु चा धनादेश देण्यात येतो अशी माहिती लोकनियुक्त सरपंच श्री शरदराव आरगडे यांनी दिली. १८ वर्ष पूर्ण असलेल्या कन्याच्या विवाह निमित्त ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.

श्री बाळासाहेब गोपीनाथ आरगडे रा सौंदाळा ता नेवासा यांची कन्या दिपाली व श्री कडुबाळ अंबादास प्रधान रा टेंभापुरी ता गंगापूर यांचे चिरंजीव कृष्णा यांच्या विवाह निमित्त सरपंच शरदराव आरगडे उपसरपंच गणेश आरगडे सर सदस्य भिवसेन गरड. हरिभाऊ आरगडे सर. सचिन आरगडे. सुनिल आरगडे. दत्तात्रय आरगडे. बाळासाहेब बोधक. रामकिसन आरगडे आदीच्या हस्ते देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *