भास्करगिरीजी महाराज

बालाजी देडगाव | अभिषेक गाडेकर – नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज देवस्थानला गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संत रोहिदास महाराज देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांचे स्वागत करण्यात आले.


यावेळी सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संत रोहिदास महाराज मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, बाबा महाराज कानडे, माजी सभापती कारभारी चेडे,  ज्ञानेश्वरचे संचालक जनाभाऊ कदम, सुनील मुथ्था, संभाजी काजळे, कुंडलिकदादा कदम, आकाश चेडे, राजाराम महाराज मुंगसे, अरुण वांढेकर, महादेव मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *