India vs England

India vs England : यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक 151 चेंडूत झळकावले. यशस्वीने पदार्पणातच वेस्ट इंडिजविरुद्ध(India vs England) 171 धावांची खेळी केली होती. आता त्याने इंग्लंडविरुद्ध शामदार शतक ठोकले आहे.

India vs England : विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात अपयशी ठरला आणि त्यानंतर शुभमन गिलनेही चांगली सुरुवात केल्यानंतर आऊट झाला.
टीम इंडिया त्यावेळी अडचणीत दिसत होती, पण भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्ध संस्मरणीय खेळी खेळली. सुरुवातीच्या दोन धक्क्यांनंतरही यशस्वीने धावगती वाढवत शामदार शतक ठोकले. यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक 151 चेंडूत झळकावले. यशस्वीने पदार्पणातच वेस्ट इंडिजविरुद्ध 171 धावांची खेळी केली होती. आता त्याने इंग्लंडविरुद्ध शामदार शतक ठोकले आहे.(India vs England)

घातक इंग्लिश गोलंदाजांचा सामना करताना यशस्वी जैस्वालने 89 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने 151 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने कसोटीतील दुसरे शतक झळकावले.नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 40 धावा जोडल्या. रोहित शर्माची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली. 14 धावा करून तो शोएब बशीरचा बळी ठरला. इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या शोएब बशीरने रोहित शर्माच्या रूपाने पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेतली आहे. यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी यांनी डाव पुढे नेला. शुभमन गिलने काही आक्रमक शॉट खेळले पण जेम्स अँडरसनने 34 धावांवर त्याला बाद केले. गिलने 46 चेंडूत 5 चौकार मारत 34 धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *