पदार्थ

नेवासा | अभिषेक गाडेकर : तालुक्यातील सुरेगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश दुबाले यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांचे पथक रस्त्याच्या कामासाठी गेले होते. यावेळी एका जमावाने रस्ता कामास विरोध करत अधिकाऱ्यांसमोरच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न बुधवारी (दि.६) दुपारी साडेतीनच्या सुमारास केला. तसेच एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री अठरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश दुबाले यांनी फिर्याद दिली. घोगरगाव सुरेगाव ते राज्यमार्ग ५० येथे जलनिस्सारणाचे काम सुरू आहे.

विजय भुजंगराव शिंदे व इतर आठ जणांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे पाण्याचा निचरा करावा यासाठी त्यांचा अर्ज होता. याबाबत नळ्या टाकण्यासाठी उपअभियंता दुबाले यांच्यासह कर्मचारी बुधवारी तेथे गेले असता दहा ते पंधरा जणांनी आरडाओरड केली. पांढऱ्या रंगाच्या ड्रममधून विकास दत्तात्रय शिंदे याने स्वतःच्या व इतरांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला. तसेच यातील योगेश सुरेश शिंदे याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *