दिंडी

नेवासा | मकरंद देशपांडे – श्रीक्षेत्र नेवासा पंचक्रोशी प्रदक्षिणा पायी दिंडी सोहळा प्रारंभ फाल्गुन शुध्द चर्तुथी बुधवार दि. १३ मार्च रोजी श्री संत ज्ञानेश्वर मंदिर श्रीक्षेत्र नेवासा सकाळी ७.०० वा. होणार आहे . वै .गु. बन्सी महाराज तांबे यांच्या कृपाशिर्वादाने व तमाम महाराज व वारकरी यांच्या सहकार्याने, सर्व देवदेवतांनी अमृत वाटपाकरीता जी क्षेत्र पंचक्रोशी योग्य मानली व यशस्वी स्वर्णामृत वाटप जेथे झाले, ज्या भूमीमध्ये भगवान श्रीहरी विष्णु (मोहिनीराज) आकल्पांतर्गत चिरकाल वास्तव्यासाठी वैकुंठ त्याग करून राहिले. ज्या पंचक्रोशीमध्ये तारकासुराने कुबेर संपलीचा निधिवास (निवास) केला, ज्या पंचक्रोशीला प्रभू रामचंद्र स्वतःच्या पदारविंदाने पवित्र करतात.

ज्या पंचक्रोशीतून विश्वपावन सकलतीर्थ जननी गोदावरी व प्रवरा पुण्यसलीला नद्या प्रवाहित होतात व सर्वात विशेष कैवल्य साम्राज्य चक्रवती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्या क्षेत्रामध्ये राहुन यावत् संकृत-प्राकृत वाङमयास लाजविल असा अनोड, अलौकिक काव्यकौस्तुभ ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण करतात व स्वतः पसायदानाचे पुढे क्षेत्र नेवासा पंचक्रोशी वर्णन त्रिभुवनेक पवित्र व अनादि ही दोन अमोलिक विशेषणे प्रयुक्त करुन दिग्दर्शित करतात. त्या अनादि व त्रिभुवनात एक पवित्र क्षेत्र नेवासा पंचक्रोशी प्रदक्षिणा करण्याचे ठरविले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या अमुल्य संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर संस्थान, श्री क्षेत्र देवगड संस्थान, श्री क्षेत्र नेवासा पंचक्रोशी प्रदक्षिणा सर्व महाराज मंडळी, वारकरी, भजनी मंडळी श्री क्षेत्र नेवासा परीसर यांनी केले आहे.

दैनंदिन कार्यक्रम : प्रातः काळी मार्गस्थ झाल्यानंतर काकड़ा व गौळणी पर्यंतचे भजन, मध्यान्ही भोजन व विश्रांती, श्री ज्ञानेश्वरी प्रवचन पश्चात मार्गस्थ होऊन वारकरी नियमाचे भजन, हरिपाठ व मुक्कामी हरिकिर्तन


फाल्गुन शुध्द चर्तुथी बुधवार दि. १३ मार्च रोजी प्रारंभ श्री संत ज्ञानेश्वर मंदिर श्री क्षेत्र नेवासा,नेवासा फाटा, भानस हिवरा, रांजणगाव देवी, कारेगाव, वडाळा बहिरोबा , खरवंडी, तामसवाडी, वाटापूर, गोमळ वाडी, रामकृष्ण आश्रम गोणेगाव , पाचेगाव, बेलपिंपळगाव, सुरेगाव, भालगाव, गोधेगाव (किसनगिरी बाबा जन्मस्थळ), गोलांडे वस्ती, सिध्देश्वर मंदिर , प्रवरासंगम , सलाबतपुर , गोंडेगाव, रामनगर भेंडा खु., श्रीनागेबाबा मंदिर -श्रीक्षेत्र भंडा बु., सौंदाळा, भानस हिवरा, नेवासा फाटा. श्री संत ज्ञानेश्वर मंदिर श्री क्षेत्र नेवासा .येथे फाल्गुन शुध्द दशमी मंगळवार दि.१९ मार्च रोजी काला, महाप्रसाद व किर्तन होऊन सांगता होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *