विज्ञान

नेवासा | अभिषेक गाडेकर – अहमदनगर जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्यामार्फत या वर्षी घेण्यात आलेल्या ‘जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा परीक्षेत इ. ९ वी मधील 67 आणि इ . ६ वी मधील विद्यार्थीनी बसल्या होत्या . सर्व विदयार्थीनी उत्तीर्ण झाल्या . इयत्ता ९ वी मधील कु . मापारी जान्हवी नारायण ही केंद्रात पहिली तर तालुक्यात पाचवी आली. इयता ६ वी मधील कु .शिंदे सिद्धी रविंद्र ही केंद्रात पहिली आली. त्याचप्रमाणे विद्यालयात मराठी – विज्ञान परिषद आणि ग्रामीण विज्ञान केंद्र नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानाच्या मूलभूत माहितीवर परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेसाठी वि‌द्यालयातील इयत्ता ८वी व ९ वी मधील ९० विद्यार्थीनी परीक्षेला बसल्या होत्या.

या परीक्षेत इयत्ता ९ वी मधील कु . पेचे काव्या सुभाष ही पहिली आली . ही परीक्षा घेण्यासाठी ग्रामीण विज्ञान केंद्र नेवासा शाखेचे श्री . वसंत कुऱ्हे यांनी विद्यालयास सहकार्य केले. या वि‌द्यार्थीनीचा सत्कार तालुका गट शिक्षणाधिकारी माननीय . शिवाजीराव कराड साहेब यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमात त्यांनी मुलींना योग्य मार्गदर्शन केले . या कार्यक्रमासाठी वि‌द्यालयाच्या प्राचार्या . श्रीमती . पानसरे मॅडम, पर्यवेक्षक श्री . मारकळी सर, ज्ञानोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . चव्हाण सर , श्री विश्वेश्वर नाथबाबा विदयालयाचे मुख्याध्यापक श्री रावसाहेब चौधरी सर उपस्थित होते. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री . दरंदले सर श्री .खोसे सर, श्री .कोरडे सर यांनी सहकार्य केले श्री . व्यवहारे सर यांनी सूत्रसंचलन केले तर श्री .कोरडे सर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *