ज्वेलर्स

गंगापूर – महिला दिनाचे औचित्य साधून गंगापुर शहरातील संतोष ज्वेलर्सच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील विविध क्षेत्रातील महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील पांडुरंग लॉन्स येथे सोमवारी(११)रोजी सायंकाळी झालेल्या एका कार्यक्रमात संतोष ज्वेलर्सच्या वतीने प्रवासी बॅगसह इतर भेटवस्तू देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोग्य विभागातील परिचारिका तसेच गंगापूर पालिकेतील स्वच्छता कर्मचारी व इतर विविध क्षेत्रातील ५० महिलांचा समावेश होता. यावेळी संतोष ज्वेलर्सचे संचालक संतोष आंबिलवादे, वैशाली अंबिलवादे, डॉ.शीतल गंगवाल, मनिषा निरपळ, पायल नाहटा, संगीता खोचे, छाया सपकाळ, शितल इंगळे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *