नेवासा | अभिषेक गाडेकर – नेवासा येथील ग्रामदैवत मोहिनी राजांच्या यात्रेमध्ये अखेरच्या टप्यात शेम्बी गोंड्याच्या बैलगाड्यांच्या शर्यतीत मोहिनी महाराजांचा जयजयकार झाला. या स्पर्धेत ७० बैलगाड्यांच्या सहभाग घेतला. मोहिनीराजाच्या यात्रेच्या शेवटच्या टप्यात आज एक बैल आणि एक घोडा असे गाड्यांच्या शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी हजारो शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती.

सकाळी दहा वाजल्यापासून प्रेक्षकांनी खुपटी रोडवरील मैदानावर गर्दी केली होती. शर्यतीच्या सुरुवातीला बारा वाजता निशाणी झेंडाची मिरवणूक मैदानापासून मोहिनीराज मंदिरापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत देखील प्रेमींचा मोठा उत्साह होता. दुपारी सुमारे बारा वाजता सुरू झालेल्या या शर्यती सायंकाळी सात वाजेपर्यंत चालल्या. ७० ते ७५ बैलगाडा शर्यतीसाठी आल्या होता. त्यामध्ये ३५ शर्यती झाल्या. यामध्ये नेवासे, राहुरी, वैजापूर, गंगापूर, शेवगाव आदी तालुक्यातून स्पर्धक आले होते.

उंबरे येथील देवळा ग्रूप विरुद्ध वैजापूर येथील वाडगे ग्रुप यांच्यामध्ये फायनल शर्यत झाली. यामध्ये वैजापूरच्या पंकज राजपूत यांचा वाडगे ग्रुप हिंदकेसरीचा विजयी ठरला. आयोजन समितीतर्फे संजय सुखदन, राजू मापारी, मकरंद देशपांडे, अनिल शिंदे, सनी सचदेव, दीपक धोत्रे, नानासाहेब शेंडे, सिद्दीकी चौधरी, राजू कडू यांनी परिश्रम घेतले.

चौकट-अंतिम विजय झालेल्या पंकज राजपूत यांच्या बैलाचे नाव पक्ष आहे, तर घोड्याचे नाव पवन आहे. बैलाची किंमत २२ लाख असल्याचे सांगण्यात आले, तर घोड्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. हौशी शर्यतीत भाग घेणारे हे सर्व स्पर्धक आपल्या जनावरांची घरच्यांपेक्षा जास्त काळजी घेत असतात, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *