शिवमहापुराण

घोडेगाव | दादा दरंदले – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवगड संस्थानचे मठाधिपती महंत गुरुवर्य भास्करगिरिजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हभप महंत सुनीलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा पं सदस्य पप्पू टेमकर व सत्यम मित्र मंडळ आयोजित शिवमहापुराण कथेला 2 मार्च पासून प्रारंभ झाला असून रोज साय 7 ते 9 या वेळेत घोडेगाव येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर परिसरात झी टॉकीज फेम प्रसिद्ध शिवमहापुराण कथाचार्य साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली महाराज यांच्या सुमधुर अमृततुल्यवाणीतून सुरू झालेली आहे.

धर्मध्वजाची स्थापना व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात धर्मध्वजाची स्थापना पूजन हभप महंत सुनीलगिरी महाराज व साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या वर्षी पासून शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली असून या वर्षी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेत कथेसाठी भव्य जागा मंडप मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई शिवमुर्ती गोमातेची मूर्ती व मुख्य स्टेजवर सद्गुरु श्री शंकर महाराजांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे व बाबा श्री अमरनाथ यांची गुफाची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे.

या ही वर्षी महाप्रसादच्या पंगती….

दररोज कथा संपन्न झाल्याच्या नंतर उपस्थित भाविक भक्तांना अन्नदाते ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.रोज 1500 ते 2000 भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेत आहे.

काल्याच्या किर्तनाने सांगता….

शनिवार दि 9 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 यावेळेत हभप साध्वी दुर्गा देवी महाराज यांची काल्याची कीर्तन सेवा होणार असून त्यानंतर समस्त ग्रामस्थ घोडेगाव यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी घोडेगाव आणि परिसरातील भाविक भक्तांना सुरू असलेल्या श्री महाशिवपुराण कथेचां श्रवणाचा लाभ घ्यावा अशी विनंती सत्यम मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *