Crime News

Crime News : सोनई चर्च मध्ये घडलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तिनही आरोपींना २० फ्रेबुरवारी पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली.

Crime News | सोनई | गणेश बेल्हेकर : अलीकडील काळात अत्याचाराच्या घटना वाढल्या असून महाराष्ट्राला हेलावून टाकणारी घटना सोनई मध्ये घडली असून सदर घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.नेवासा तालुक्यातील सोनई येथील बेल्हेकरवाडी रोड लगत असलेल्या विनियार्ड चर्च मध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

या गोष्टीची वाच्यता कुठे केल्यास तुमचे घरचे मरून जातील अशा प्रकारची धमकी या चिमुरड्या मुलींना या नराधमांनी दिली होती अशी माहिती पीडित मुलींकडून समजले आहे. धर्माच्या नावाखाली चाललेला हा प्रकार अतिशय निंदनीय व गलिच्छ माणुसकीला काळीमा फासणारा असून त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सदर घटनेची फिर्याद पीडित अल्पवयीन मुलींच्या आईंनी सोनई पोलीस ठाण्यात दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेवगाव उप विभागीय अधिकारी सुनील पाटील व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष शेळके यांनी घटना स्थळी भेट देत आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना देत घटनेतील आरोपी उत्तम वैरागर, संजय वैरागर ,सुनील गंगावणे यांना अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले.

तिन ही आरोपींना कोर्टासमोर हजर केले असता २० फ्रेबुरवारी पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी वरुन संबधित आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष शेळके हे करत आहेत. काल दिवसभर मात्र पोलीस ठाण्याभोवती जमावाने घेरावा घातलेला होता.

One thought on “Crime News : सोनई चर्च मध्ये अल्पवयीन मुलींवर केलेल्या अत्याचार प्रकरणी तिनही आरोपींना पोलीस कोठडी..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *