सन्मान

यशवंत स्टडी क्लबच्या विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड.

सोनई | राहुल राजळे – ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोनई येथे यशवंत स्टडी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे दरवर्षी अनेक विद्यार्थी येथून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत दाखल होतात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या परीक्षेत अतुल सुरेश हापसे यांची लघुटंकलेखक पदी आरोग्य विभाग कोल्हापूर व सारंग बाबासाहेब आढाव लघुलेखक/स्टेनोग्राफर वर्ग 2 जिल्हा परिषद जालना येथे निवड झाली.

याबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या हस्ते या यशवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या यशात वाटा असणाऱ्या पालकांचा विशेष सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बोलतांना अतुल हापसे व सारंग आढाव म्हणाले यशवंत स्टडी क्लबने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेमुळे आम्ही हे यश मिळवू शकलो. याप्रसंगी सहसचिव डॉ विनायक देशमुख, जालिंदर घुले, पाराजी मोरे,प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कल्हापुरे,सचिन शेटे, दादासाहेब तुवर आदी उपस्थित होते.

One thought on “यशवंतच्या गुणवंताचा उदयन गडाखांच्या हस्ते सन्मान.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *