संरक्षण

नेवासा | राजेंद्र वाघमारे – भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांना त्रास देणाऱ्या गुंड विजय पठारे यास व त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारास अटक करून पुन्हा तुरुंगात रवानगी करावी व भद्रे कुटुंबास तातडीने संरक्षण द्यावे , अशी मागणी नेवासा तालुका भारतीय जनसंसदने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे . पोलीस निरीक्षक नेवासा यांचे मार्फत भारतीय जनसंसदने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , नगर तालुक्यातील प्रख्यात गुंड विजय पठारे याने गुंड प्रवृत्तीच्या सुमारे ४० – ५० साथीदारांसह भद्रे यांच्या न्यायालयात चालू असलेल्या वादातीत जमिनीवर अनधिकृत ताबा मारलेला आहे.

तसेच सरपंच शरद खंडू पवार यात सहभागी असुन त्यांचेवरही यापुर्वीचे गुन्हे दाखल आहेत. दोघांनी चिचोंडी पाटील गावात प्रंचड दहशत निर्माण केली आहे. या दोघांसह त्यांचे साथीदारांस तातडीने अटक करून गावात त्यांनी पसरवलेली दहशत कमी करावी. सुधिर भद्रे हे सनदशिर मार्गाने कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते असुन भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष आहेत. निवेदनावर भारतीय जनसंसदचे रामराव पाटील भदगले , कारभारी गरड , डॉ.अशोकराव ढगे , कृष्णा डहाळे आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *