रयतेचा राजा

नेवासा फाटा | ज्ञानेश्वर सिन्नरकर जि.प.प्राथमिक शाळा भानसहिवरे ता.नेवासा या शाळेची सहल नुकतीच शिवाजी राजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर गेली होती.विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २३-२४ साठी रयतेचा राजा हे हस्तलिखित बनवले. हस्तलिखिताचे प्रकाशन विद्यार्थी,सर्व शिक्षक,मुख्याध्यापिका यांच्या हस्ते शै.सहल प्रसंगी किल्ले शिवनेरी येथे झाले.त्या प्रसंगी मुख्याध्यापिका सुनंदा इधाटे यांनी सर्व बाललेखकांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी नेहमी चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे असे आवाहन केले.यावेळी हस्तलिखिताच्या संपादक वर्षा ठाणगे – शेटे यांनी हस्तलिखितामुळे मुलांचे वाचन घडून विचारशक्तीला चालना मिळते व विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो अशी यावेळी भावना व्यक्त केली.

यावेळी “जय शिवाजी,जय भवानी “या घोषनेने किल्ल्याचा परिसर गजबजून गेला. महराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी राजांचे जन्म स्थळ पाहिल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता या प्रसंगी रंगनाथ गुंजाळ,संगिता निमसे,सुनिता देवकर,रतनबाई महांडुळे,वैभव दिघे,सुमन सोळसे,महेश देवतरसे,संदिप खेसे,रत्नमाला महाडीक हे शिक्षक उपस्थित होते.
या हस्तलिखीतातून विद्यार्थ्यानी शिवरायांचे जीवन चरीत्र व गड किल्ल्यांची माहीती लिहण्याचा प्रयत्न केला. शिवजन्म स्थळी हे प्रकाशन झाल्याने विद्यार्थ्यांचा हा अनोखा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी डिंबे धरण, भीमाशंकर, ओझर, लेण्याद्री या ठिकाणी भेटी दिल्या. या आगळ्या वेगळ्या उपक्रमा बद्दल विद्यार्थ्यांचे नेवासा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पाटेकर साहेब विस्तारअधिकारी विश्वनाथ धिंदळे, भाऊसाहेब जगताप, केंद्रप्रमुख सुखदेव सोनवणे यांनी कौतुक केले अभिनंदन केले
सहल यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालकांनी शिक्षकांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *