shivjayanti

Shivjayanti 2024 : नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पायी ज्योतीचे हे सातवे वर्ष आहे.

Shivjayanti 2024 | गणेशवाडी | गणेश बेल्हेकर – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पायी ज्योतीचे हे सातवे वर्ष आहे. या सोहळ्यात शिवचिंदबरम माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या वेषभूषा व मावळ्यांची वेषभूषा केलेली विद्यार्थी या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते. जिल्हा परिषदेचे सुनील भाऊ गडाख व ज्योत मंडळ यांच्या उपस्थितीत महा आरती सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र लोहकरे सर यांनी केले.

या वेळी प्रमुख उपस्थिती दत्तात्रय लोहकरे, क्रुष्णा तांदळे, नारायण दहिफळे, रामकिसन पालवे,गणेशवाडी सेवा सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अक्षय लोहकरे, मधुकर दरंदले,हे होते. ज्ञानेश्वर लोहकरे, विश्वेश बेल्हेकर, सौरव शेटे, ओमकार लोहकरे, विजय लोहकरे, अभि बारवेकर, अजित बेल्हेकर, क्रुणाल बेल्हेकर, भरत बेल्हेकर, ओम लोहकरे , प्रथमेश बेल्हेकर, समर्थ बेल्हेकर, ऋषीकेश लोहकरे, राहुल लोहकरे, सौरभ लोहकरे, वैष्णव बारवेकर, प्रसाद ठुबे,दिपक लोहकरे, सार्थक गडाख, सर्वश फलके,लक्ष्मण दहिफळे, निवृत्ती लोहकरे, शुभम शेटे, जय लोहकरे यांनी या पायी ज्योती मध्ये आपला सहभाग नोंदवला होता. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *