छत्रपती शिवाजी महाराज

भेंडा | अभिषेक गाडेकर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या जीवनात नियोजनाला महत्व दिले होते. शिवचरित्रातून केवळ पराक्रम व शौर्य नाही तर जगावे कसे,वागावे कसे याचेही ज्ञान मिळते. शिवरायांची प्रत्येक कृती नियोजन बद्ध होती. छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारे राजे होते. असे विचार श्रीरामपूर येथील युवा व्याख्याते प्रथमेश वर्धावे यांनी व्यक्त केले.भेंडे येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात ईतिहास विभागाने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात ‘छत्रपती शिवाजी महाराज: जीवन व कार्य ‘या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष लांडगे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी शिक्षण संस्थेचे विश्वस्त व इतिहास विभाग प्रमुख डॉ नारायण म्हस्के यांनी युवा व्याख्याते व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी प्राचार्य डॉ शिरीष लांडगे यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुरू केल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवरायांचे कार्य समजून घेण्यासाठी ‘शीवभारत’ आणि ‘सभासद बखर’ या दोन ग्रंथांचे महत्त्व विशद करुन शिवचरित्र युवकांनी अभ्यासण्याचे आवाहन केले.

प्रारंभी शिवप्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.मृणाल भोसले यांनी केले. प्रा. संतोष शेळके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीना पोकळे यांनी केले. प्रा.विकास कसबे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रा डॉ.संभाजी तनपुरे, प्रा. डॉ. संजय दरवडे, प्रा.पांडुरंग देशमुख,प्रा.डॉ. विजय अडसूरे,प्रा डॉ दत्ता वाकचौरे श्री प्रभाकर देशमुख यांचेसह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

One thought on “दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारे छत्रपती शिवाजी महाराज : युवा व्याख्याते प्रथमेश वर्धावे”
  1. […] दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारे छत्रपत… रस्त्यात अडवून डोक्यात कोयत्याने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *