शेतकरी

नेवासा | मंगेश निकम – सध्याचे निसर्गाचे वातावरण पाहता सध्याला अवकाळीचे सावट शेतकऱ्यावरती पुन्हा ओढवण्याचे चित्र नेवासा तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे आज दिनांक 2 मार्च रोजी निसर्गामध्ये ढगाळ वातावरण निर्मिती झाल्यामुळे तसेच काही परिसरामध्ये पावसाची रिमझिम सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे.

या पावसामुळे काढायला आलेल्या गहू- हरभरा पिकाचे अतोनात नुकसान होणार असल्याचे चित्र भविष्यकाळामध्ये पाहावयास मिळनार का? तसेच मागील अवकाळीचे अद्यापही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसून तेच दुसरे अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे तरी या अवकाळीच्या पावसामुळे शेतकरी राजा पूर्णतः मोडकळीस आल्याचे चित्र नेवासा तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे.

तसेच या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याची चिंता आणखीनच वाढली आहे तसेच सध्याला ऊस तोडीचा ही प्रश्न मोठ्या प्रमाणात नेवासा तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे. नेवासा तालुक्यामध्ये ऊस तोडी संदर्भात शेतकरी पूर्ण मेटाकुटीस आलेला असून नेवासा तालुक्यामध्ये ऊसतोड कामगार ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीसाठी पैसे मागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे तरीही या ऊसतोड कामगारावरती प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ते कारवाई करणे गरजेचे महत्त्वाचे आहे.

शेतकरी राजा हा बारा ,महिने 18 महिने आपल्या ऊसाला अहोरात्र कष्ट करून पाणी खते कर्ज काढून उसाची मेहनत करत असतो परंतु ऊस तोडणीच्या वेळी ऊसतोड कामगार हे शेतकऱ्यांना मनाला वाटेल ती रक्कम मागतात व शेतकऱ्यांना नाही इलाज असतो ती रक्कम ऊसतोड कामगारांना द्यावी लागते अन्यथा आपला ऊस वावरांमध्येच उभा ठेवावा लागतो अशीही मनमानी ऊसतोड कामगाराची नेवासा तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे या ऊसतोड कामगारामुळे हाल अपेष्टा सहन करणारा शेतकरी तसेच अडचणीमध्ये सापडल्याने शेतकऱ्यांना ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात मनमानी करताना नेवासा तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे .

परंतु यामध्ये कारखाना प्रशासन तितकेच जबाबदार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासन यावरती कोणते कारवाई करताना पाहावयास मिळत नाही.तसेच या ऊसतोड कामगारांना कारखान्याचीच साथ आहे की काय ?हा ही एक प्रश्न सर्वसामान्य शेतकरी वर्गांमधून उपस्थित केला जात आहे. तरीही भविष्य काळामध्ये कारखाना तसेच महाराष्ट्र सरकार या ऊसतोड कामगारावरती त्यांच्या मनमानी कारभारावरती आळा घालणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच या ऊसतोड कामगाराचे व अवकाळी निसर्गाच्या संकटांमधून शेतकरी कधी बाहेर येणार हा प्रश्न अन-उरुत्तरितच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *