वाळू

नेवासा – तालुक्यातील मौजे बहिरवाडी येथील गट नं. ३९ मधिल क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे अंदाजे ११८ ब्रास उत्खनन केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांनी दत्तात्रय घमाजी गवळी यांना ४७ लाख ३२ हजार ३०० रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी माहिती अधिकार २००५ अंतर्गत याबाबत तक्रारी अर्ज केला होता.

त्याअनुषंगाने मंडळाधिकारी नेवासा खुर्द यांनी मौजे बहिरवाडी येथे दत्तात्रय घमाजी गवळी यांच्या गट नं. ३९ मधील क्षेत्रामध्ये पाहणी केली असता त्यांनी तेथे अनधिकृतपणे अंदाजे ११८ ब्रास उत्खनन केले असल्याबाबत पंचनामा व अहवाल तहसीलदार यांना सादर केलेला आहे.

त्यावरून ११८ ब्रास वाळू हे गौण खनिज उत्खननाबाबत परवानगी पास आहे किंवा कसे याबाबत कागदपत्रासह ही नोटीस मिळाले. पासून सात दिवसाचे आत समक्ष हजर राहुन खलासा करावा. खुलासा सादर न केल्यास व सादर केलेला खुलासा संयुक्तीक न वाटल्यास महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) अन्वये ४७ लाख ३२ हजार ३०० रुपये दंडाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

One thought on “बहिरवाडी येथील अनाधिकृत वाळू उत्खनन प्रकरणी उत्खनन प्रकरणी ४७ लाख रुपये दंडाची नोटीस..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *