गुन्हा

गणेशवाडी | गणेश बेल्हेकर – शिंगवे तुकाई येथे पोटात चाकु खुपसुन एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार मंगल संजय होंडे रा. शिंगवेतुकाई यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे त्यांचे पती संजय जनार्धन होंडे यांनी आरोपी ज्ञानेश्वर सुनील होंडे यास आपला नातू हा नेहमी बाहेर अंगणात खेळत असतो. तेव्हा ढंपर हळु चालवत जा. याचा राग मनात धरुन आरोपी आकाश संजय येळवंडे रा. घोडेगाव,ज्ञानेश्वर मच्छिंद्र पुंड ,

अविनाश एकनाथ विरदकर , मोहित सुनील होंडे सर्व रा. शिंगवेतुकाई यांनी फिर्यादी च्या पतीच्या पोटात चाकु ने वार करत जखमी केले व फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्यानुसार आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर व कलम-९४/२०२४ भादवि कलम ३०७ ,३२६, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष शेळके हे करत आहे.

One thought on “शिंगवे तुकाई येथे चाकुच्या हल्यात एक जखमी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *