गुन्हा

नगर जिल्ह्यामध्ये सोन‌ई पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हयाची मालिका सुरू असून हे पोलीस ठाणे सध्या चर्चेत असून गुन्हा घडण्याची मालिका सुरूच असून आहे.

गणेशवाडी | गणेश बेल्हेकर – नगर जिल्ह्यामध्ये सोन‌ई पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हयाची मालिका सुरू असून हे पोलीस ठाणे सध्या चर्चेत असून गुन्हा घडण्याची मालिका सुरूच असून ते बंद होण्याचे नाव घेईना त्यामुळे सध्या सोन‌ई पोलीस ठाणे चर्चेत आहे. दि 20 फ्रेबुरवारी रोजी दुपारी २.३०च्या दरम्यान सोनई येथे राहत्या घरात घुसून मारहाण प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत वैभव वाघ हा जखमी झाला आहे तर त्याच्या बहीणीस लज्जा उत्पन्न होईल असे क्रुत्य केले.

समजलेल्या माहिती नुसार संदिप लांडे, नामु कोरडे, संभाज लांडे, अनिकेत काळे, सोमा लांडे सर्व राहणार लांडेवाडी तालुका नेवासा या पाच युवकांनी तलवार व लोखंडी राॅडने घरात घुसून वैभव वाघ यास जातिय वाचक शिवीगाळ करत जबर मारहाण करुन जखमी केले. त्याची बहीण सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल असे क्रुत्य केले. मोनाली वाघ रा. सोनई यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन संदीप लांडे, संभाजी लांडे, नामु कोरडे, सोमा लांडे, अनिकेत काळे, या पाच जणांविरुद्ध गुन्हा र. १८६० चे ३५४(अ), ३२४,३२३,४५२,१४३,१४७,१४८,१४९,४०८,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शेवगाव उप विभागीय अधिकारी सुनील पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *