मोहिनीराज

नेवासा | गुरुप्रसाद देशपांडे – ग्रामदैवत मोहिनीराज यात्रेच्या काल्याच्या दिवशी माघपंचमीच्या मुहूर्तावर मोहिनीच्या अभिषेकासाठी प्रवरा संगम येथील दक्षिण गंगा गोदावरीचे पाणी कावडीने आणणाऱ्या 175 कावडी भक्तांनी शहरांमध्ये पाच ठिकाणी सुमारे 82 बालकांना ओलांडून त्यांच्या भविष्यासाठी शुभ आशीर्वाद दिले

भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराचे जगातील एकमेव मंदिर नेवासा येथे असून या मंदिराची यात्रा सुरू आहे वीस दिवस चालणाऱ्या या यात्रेतील आज काल्याचा दहीहंडीचा महत्त्वाचा दिवस आहे आज पहाटे भगवान मोहिनीला शाही स्नान घालण्याचा मान वडार समाजाला असतो वडार समाजातील तरुण व गावातील इतरही तरुण मंडळी चतुर्थीला रात्री प्रवरा संगम येथे जातात व नदी पात्रात मध्यरात्री स्नान करून ओल्यानेच पाण्याची कावड घेऊन येतात.

पहाटे साडेपाच सहाच्या सुमारास सदरच्या कावडीचे युवक नेवासा शहरात प्रवेश करताना त्यांचे ठिकठिकाणी फटाके फोडून व ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले जाते कावडीचा मार्ग कडूलिंबाच्या ढगळ्यांनी पाणी शिंपडून पवित्र केला जातो

मधमेश्वर नगर, मळगंगा मंदिर, नेवासा बस स्थानक खोलेश्वर गणपती मंदिर, नगरपंचायत चौक आदी ठिकाणी यांना औक्षण केले जाते या पाचही ठिकाणी परिसरातील महिला आपल्या लहान मुलांना कावडीच्या युवकांच्या पायाशी घालतात सर्व कावडी चे पाणी आणलेले तरुण या रस्त्यावर झोपलेल्या मुलांच्या अंगावरून त्यांना ओलांडून जातात पंचमीला आपल्या मुलांना गोदावरीच्या पाण्याने ओलांडले तर त्यांचे आयुष्यात चांगले होते अशी श्रद्धा परिसरातील स्त्रियांची व पालकांची आहे त्यामुळे कावडीच्या पायावर मुले घालण्यासाठी कावडीच्या मार्गावर मोठी गर्दी करतात.

पाठशाळेमध्ये उत्सव मूर्ती मोहिनीराजाला मोठ्या परातीमध्ये घेऊन त्याला या सर्व कावडी आणणाऱ्या युवकांनी स्वतःच्या हाताने शाही स्नान घातले यावेळी बडवे पुजाऱ्यांनी मोठा मंत्र घोष केला होता तर उपस्थित भाविकांनी मोहिनीराजाच्या जयजकार केला.

2 thoughts on “श्री मोहिनीराज महाराजांच्या यात्रेत १७५ कावडींचा सहभाग; ८२ मुलांनी घेतले लोटांगण.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *