मोहिनीराज महाराज

नेवासा | गुरुप्रसाद देशपांडे – अमृतवाहिनी प्रवरानदीच्या तीरावरील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयातील पाच दिवस दर्शनासाठी असलेल्या भगवान श्री मोहिनीराजाची उत्सव मूर्ती पालखीतून वाजत गाजत मंदिर प्रांगणात आल्यावर काल्याची दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी मंदिर परिसरात ठिक-ठिकाणी काल्याचे वाटप करण्यात आले. गुरुवारी पहाटे वडार समाज बांधव यांनी प्रवरासंगम येथून आलेल्या कावडीचे नगर पंचायत चौकामध्ये आल्यानंतर सुवासिनीनी पंचारती ओवाळून स्वागत केले. उत्सवमूर्तीस आणलेल्या गंगाजलाने जलाभिषेक करण्यात आला. यात्रा काळात ह भ प भास्करगिरी महाराज , गोपालक भागवताचार्य राधाकृष्ण महाराज राजस्थान, माजी मंत्री शंकरराव गडाख , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सुनिलगिरी महाराज, उद्धव महाराज मंडलिक नेवासकर , रमेशानंदगिरी महाराज ,माजी .आ. बाळासाहेब मुरकुटे माजी खासदार वाकचौरे यांनी श्री मोहिनीराज मुर्तीचे दर्शन घेतले .

सोमवारी सायंकाळी ६ वाजता न्यायालयाच्या इमारतीमध्ये ठेवलेल्या पालखीचे पुजन जिल्हा व अति .सत्र न्यायाधीश व्ही वाय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर पाकशाळा येथून उत्सवमूर्तीचे मंदिराकडे प्रस्थान झाले.यावेळी टाळमृदुंगाचासह सनई चौघडयाचा निनादात व मोहिनीराज महाराज कि जयचा जयघोष करत हनुमान भजनी मंडळाचे भजनी मंडळ, प्रवरासंगम येथील मुबारक बॅन्डच्या भक्तीगीत वाजत गाजत उत्सव मूर्तीचे कोर्ट गल्ली,देशपांडे गल्ली मार्गावर भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी निखिल जोशी यांचा देवाजी राखोळ आवाज निनादतहोता. श्री मोहिनीराजचा जय जयकार भावीक करत होते. पालखी मार्गावर ठिक-ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. उत्सवमूर्ती मंदिरात गेल्या नंतर मानकरी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल्याची दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी पालखीवर भाविकांनी रेवड्यांची उधळण केली.

 मोहिनीराजांचा जयजयकार काल्याप्रसंगी मंदिर परिसरात जमलेल्या भाविकांच्या गर्दीमधून घुमत होता.मंदिर परिसरात नागरिकांच्या वतीने काल्याचे वाटप करण्यात आले. शहरातील रस्ते गर्दी फुलून गेले होते.मुख्यपेठेसह रस्त्यांवर मिठाई, सौंदर्यप्रसाधने, मिठाई, गृहपयोगी,खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली होती . पोलिस प्रशासनाने यात्रा उत्सव काळात पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *