शेती

नेवासा | अभिषेक गाडेकर डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना करण्यात आलेली असून योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीय शास्वत शेती अभियान (NMSA) अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना (PKVY) च्या धर्तीवर करण्यात येत आहे. श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र दहीगाव ने येथे अहमदनगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील नैसर्गिक शेतीचे शेतकरी गटातील ७०४ शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापैकी पहिली टप्प्यात नेवासा, नगर, पाथर्डी, जामखेड, कर्जत व श्रीगोंदा येथील २५८ शेतकऱ्यांना दोन दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले आहे .

सदर प्रशिक्षणात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी नैसर्गिक शेती संकल्पना, त्याची मुलतत्वे, कार्य पद्धती या विषयी मार्गदर्शन केले. तर केव्हीके चे विषय विशेषज्ञ श्री. माणिक लाखे यांनी शेतकऱ्यांना शेतावर नैसर्गिक घटकापासुन शेती उपयुक्त निविष्ठा तयार करण्याविषयी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. शेतकऱ्याना स्वतः निविष्ठा बनवण्याचे शिकवण्यात आले. याप्रशिक्षणाना प्रसंगी प्रकल्प उपसंचालक आत्मा अहमदनगर चे श्री विलास नलगे, नेवासा तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, तालुका कृषी अधिकारी पाथर्डी अनंत डमाळे, शैलेश आहेर, श्रीकांत जाधव व विविध तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक इत्यादी मान्यवरांनी उपस्थित होते.

कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने हे श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील, मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील, मा.आ.पांडूरंग अभंग, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितीज घुले पाटील, संस्थेचे सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. या प्रशिक्षणासाठी केव्हीके चे विषय विशेषज्ञ सचिन बडधे, नारायण निबे, नंदकिशोर दहातोंडे, इंजी.राहुल पाटील, डॉ.चंद्रशेखर गवळी, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट, डॉ.प्रवीण देशमुख, दत्तात्रय वंजारी, रामा लांडगे, सागर ढिसले व अंकुश शिरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले.

One thought on “डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक शेती प्रशिक्षणाचे कृषी विज्ञान केंद्र दहीगाव येथे आयोजन.”
  1. […] दशक्रिया विधी घालण्याचा ईशारा.. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अं… टेम्पो चालकास गावठी कट्ट्याचा धाक […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *