अजिंक्यपद कुस्ती

नेवासा | अभिषेक गाडेकर – राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत त्रिमूर्ती कुस्ती केंद्राच्या पैलवानांनी एक रौप्य पदक व एक कास्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीचे परिषदेच्या मान्यतेने स्व.मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज पुणे येथे नुकत्याच झालेल्या पहिल्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद व २६ वरिष्ठ गट ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा दिनांक २० ते २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पार पडल्या या स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती कुस्ती केंद्राच्या सहा पैलवानांची निवड झाली होती.

पैकी वरिष्ठ गट ग्रीको रोमन स्पर्धेत ६७ किलो वजन गटामध्ये योगेश रमेश चंदेल याने अतिशय रोमांचक कुस्त्या करत रौप्य पदकाची कमाई केली तर पहिल्या सब ज्युनिअर राज्य स्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अतुल संतोष मोरे यानी ५५ कोलो वजन गटामध्ये कांस्यपदकाची कमाई केली.यशस्वी पैलवानांना संस्थेचे प्रशिक्षक संभाजी निकाळजे यांचे प्रशिक्षण लाभत आहे.

तसेच क्रीडा शिक्षक अभिजीत दळवी, महादेव काकडे, छबुराव काळे ,गणेश शिंदे, अशोक पानकडे, साहेबराव दाने, संदीप वाघमारे, मुकेश जाधव, नितीन चिरमाडे, विजू गायके,माधुरी भोसले,गौरव दाने यांचे सहकार्य लाभत आहे.यशस्वी पैलवानांचे संस्थेचे संस्थापक आदरणीय साहेबराव घाडगेपाटील, अध्यक्षा सौ. सुमतीताई घाडगेपाटील, उपाध्यक्ष स्नेहल दीदी घाडगेपाटील, सचिव मनीष घाडगेपाटील, राष्ट्रीय खेळाडू प्राचार्य सोपानराव काळे, पर्यवेक्षक संजयसिंह चौहान,प्राचार्य सचिन कर्डिले, समन्वयक दत्तात्रय वांढेकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *