टरबूज

नेवासा | मंगेश निकम – तालुक्यातील खेडले काजळी येथील प्रगतशील शेतकरी रामकृष्ण कोरडे यांच्या शेतावर कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी उन्हाळी हंगामातील पिकांची पाहणी केली व त्याचबरोबर महत्त्वाचे टरबूज पिकावर चर्चा घडवून शेतकऱ्याच्या बांधावर मार्गदर्शन केले डॉक्टर ढगे म्हणाले की उन्हाळी हंगामात टरबूज पीक चांगले येते याची लागवड जानेवारी महिन्यात नवीन जात निवडून करावे तसेच दोन ओळीतील अंतर सात फुट व दोन रोपातील अंतर दोन ते अडीच फूट ठेवावे लागवड करताना ठिबक सिंचन चा वापर करावा म्हणजे विद्राव्य खते देता येतात विद्राव्य खतामुळे खताच्या खर्चात बचत होते व ठिबक मुळे पाणी वेळेवर दिल्यामुळे कमी लागते.

तसेच मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो व सर्व खते पिकांना मिळतात उन्हाळी हंगामात कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो त्यामुळे निर्मूलनाचा खर्च कमी येतो, या सर्व नवीन तंत्राचा वापर रामकृष्ण कोरडे यांनी केल्यामुळे त्यांचे टरबूज पिक बहारदार आले आहे, शिवाय बाजारात आंबे येण्याच्या अगोदर टरबूज उपलब्ध होतील व त्यामुळे बाजारभाव ही योग्य मिळेल अशी सर्व चर्चा शेतकऱ्यां बरोबर करण्यात आली याप्रसंगी जिल्हा खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित संचालक शिवाजीराव मते ,मुळा कारखान्याचे नवनिर्वाचित कामगार संचालक सुदामराव कोरडे ,व मुळे आणि पतसंस्थेचे मॅनेजर हनुमंतराव उदे, प्रगतशील शेतकरी संभाजीराव कुताळ ,यांनी चर्चेत भाग घेतला सदरची चर्चासत्र खेडले काजळी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ ढगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मुळा सहकारी साखर कारखान्याचे स्लिप मास्तर सकाहरी कोरडे पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *