पुरस्कार

पाचेगाव | अशोक तुवर – नेवासा तालुक्यात कृषी विभागात कार्यरत असणारे कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांना सन २०२१ चा पुणे विभागातून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना लवकरच राज्य कृषी आयुक्तांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न २०२१पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शेती शाळेच्या माध्यमातून गावोगाव काम शेतकऱ्यांना मार्गदर्शन एक हजार पेक्षा जास्त शेती शाळा वर्ग प्रशिक्षण कृषी विभागातील अधिकारी,कर्मचारी यांची प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून काम शेतकऱ्यांमध्ये शेतकरी गट तयार करणे व कृषी विभागाच्या योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे विशेष कीड रोगसर्वेक्षण प्रकल्प इंद्र शेती कांदा सोयाबीन,कापूस उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न श्री बिबवे यांनी केले आहे.

महिला शेतकरी शेती शाळा जिल्हा राज्य स्तरावरील प्रशिक्षण संस्थांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम कांदा, सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांमध्ये यूट्यूब तसेच शेतकरी मेळावे शेती शाळाशेतकरी लेखांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन वेळोवेळी मार्गदर्शन करून बळीराजासाठी त्यानी २४ तास सेवा उपलब्ध करून दिली. त्या कामाची पावती म्हणून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न २०२१ पुणे विभागातून त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.शासनाचे शेतकरी पुरस्कारांबरोबर या पुरस्कारांची वितरण लवकरच कृषी मंत्री व राज्य कृषी आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल नेवासा तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे,दै सार्वमतचे पत्रकार अशोक तुवर,दै लोकमतचे पत्रकार रमेश शिंदे व परिसरातील शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

One thought on “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार बेळपिंपळगाव येथील कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांना जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *