आंदोलन

सोपान बाबासाहेब रावडे यांनी आपल्या स्वत: च्या दोन्ही किडण्या व इतर किमती अवयव महाराष्ट्र शासनाला दान करण्याचा निर्णय घेतला असून जिल्हा परिषद अहमदनगर येथे २० फेब्रुवारी पासून बेमुदत देहदान आंदोलन सुरू केले आहे.

शासनाचे आदेश असतांनाही ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक मशीन न बसविणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, सरपंचावर कारवाई व्हावी, ग्रामपंचायत मुख्यालयी न राहता ग्रामसभेचे खोट्या माहितीचे ग्रामसभेचे ठराव देऊन शासनाची फसवणूक करून घरभाडे घेणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, मुख्यालयी राहत असल्याबाबत दिलेल्या सर्व ग्रामसभेच्या ठरावांची उलटतपासणी व्हावी, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेकांनी मासिक दैनंदिनी दिलेली नसताना त्यांचे बेकायदेशीरपणे प्रवास भत्ता मंजूर करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी,

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत लेखा परीक्षण अहवालात घेतलेल्या आक्षेपांची पूर्तता न करणार्‍या ग्रामसेवकांवर कारवाई व्हावी, ग्रामविकास अधिकारी पदावर बेकायदेशीर पणे काम करणार्‍या ग्रामसेकांवर कारवाई व्हावी, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रामकृषि विकास समिति स्थापन न करणार्‍या ग्रामसेवक व इतर अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी या विषयांबाबत संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांकडे वेळोवेळी तक्रारी, आंदोलने करण्यात आली तरीही त्या तक्रारीनुसार अजूनही योग्य चौकशी, दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होत नसल्यामुळे कांगोणी ता नेवासा येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान बाबासाहेब रावडे यांनी आपल्या स्वत: च्या दोन्ही किडण्या व इतर किमती अवयव महाराष्ट्र शासनाला दान करण्याचा निर्णय घेतला असून जिल्हा परिषद अहमदनगर येथे २० फेब्रुवारी पासून बेमुदत देहदान आंदोलन सुरू केले आहे.

भ्रष्टाचार, शासनाची फसवणूक करणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नसल्यामुळे त्यांच्याकडून किंवा त्यांच्यामार्फत इतरांकडून माझी आणि माझ्या कुटुंबियांची कधीही हत्या होऊ शकते. माझी हत्या झाल्यावर माझे शरीरातील किमती अवयव वाया जाऊ नये म्हणून माझी हत्या होण्यापूर्वीच माझ्या दोन्ही किडण्या आणि इतर किमती अवयव हे महाराष्ट्र शासनाला दान करण्याचा निर्णय घेतला असल्याचा रावडे यांनी निवेदनात म्हटले आहे. भ्रष्टाचारी अधिकार्‍यांपासून सोपान रावडे आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवाला धोका असल्यामुळे पोलिस संरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

One thought on “जिल्हा परिषद अहमदनगर येथे नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचे बेमुदत देहदान आंदोलन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *