Accident

Accident : नेवासा श्रीरामपूर रस्त्यावर लोखंडी फॉलवर अपघात

पाचेगाव | अशोक तुवर – नेवासा तालुक्यातील पाचेगाव (कारवाडी)येथील भारत सर्व सेवा संघाचे माजी शिक्षक संभाजी कोंडीराम गायकवाड वय वर्ष ६७ (सर )यांचे दुःख निधन झाले. गायकवाड सर हे सकाळी आठ वाजता लोखंडी फॉल जवळ असणाऱ्या पेट्रोल पंप कडे गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी जात असताना श्रीरामपूर कडून नेवासा कडे जाणाऱ्या भरधाव वेगाच्या क्रेटा कंपनीच्या कारने गायकवाड यांच्या हिरोहोंडा गाडीला वेगाने धडक(Accident) दिली.

त्यात संभाजी गायकवाड सर हे जबर जखमी झाले होते,त्यांना पुढील उपचारासाठी नेत असताना खोकर जवळ त्यांची प्राणज्योत मावळली असून श्रीरामपूर येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तरी सायंकाळी चार वाजता कारवाडी येथे राहत्या घराजवळ त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गायकवाड सर यांचे अचानकपणे झालेल्या अपघातात निधन झाल्याने परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. गावातील व शाळेतील विद्यार्थ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

One thought on “Accident : माजी शिक्षक संभाजी गायकवाड यांचे अपघातात निधन”
  1. […] Accident : माजी शिक्षक संभाजी गायकवाड यांचे … Online Fraud : नेवासा फाटा येथील व्यावसायिकाला ३८ हजारांचा ऑनलाईन गंडा. […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *