नेवासा | अभिषेक गाडेकर सामाजिक कार्यकर्ते इमरान दारूवाला नेवासा यांच्यावर उपविभागीय अधिकारी भाग अहमदनगर यांनी १ वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातुन हद्दपार केले होते. त्या संदर्भात श्री. इमरान शेख यांनी कार्यवाही ला मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या कड़े अपील दाखल करून या आदेशाला स्थगिति द्यावी म्हणून विनंती केली होती. त्यांची विनंती मा. विभागीय आयुक्त सो यांच्या कोर्टाने मान्य करुन उपभागीय अधिकारी भाग अ. नगर यांच्या आदेशाला दि.५-३-२०२४ पर्यंत स्थगिति दिली आहे.

इम्रान फारूक शेख (दारूवाला) यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की मला मा. विभागीय आयुक्त सो यांच्या कोर्टाने स्थगिती दिली असुन माझ्यावर कलम ५००, 37 रस्तारोको, कलम २२७, १४३ व कलम ३५३ असे ३ गुन्हे असुन त्या मध्ये कलम ५०० व कलम २२७ हे राजकीय गुन्हे असुन या दोन्ही गुनह्यात ५० ते ६० लोकांचा या गुन्ह्यात समावेश आहे. नोटीशी वर मला व इतर लोकांना या दोन्ही गुनह्यात सोडलेल आहे. तीसरा गुन्हा ३५३ हा गुन्हा बनावट पद्धतीन रंगवुन राजकीय आणि अधिकारी यांच्या संगनमताने माझ्यावर दाखल केला हे सर्व नेवासकर नागरीकांना माहित आहे.

मी चोर, दारोडेखोर, अवैध व्यवसायिक, लॅंड माफिया या पैकी कोणी ही नाही तरी ३ गुन्ह्यवर आमच्या प्रतिष्ठित कुटुंबाला व मला गुन्हेगार म्हणून संबोधले जात आहे. याच मनाला वाईट वाटत आहे. आता माझ्यावर षडयंत्र करुन मला हद्दपार करण्याचा प्रयत्न होतोय परंतु मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सर्वांच्या आशिर्वादाने मला लवकरच न्याय मिळेल.न्यायालयीन कामी ऍड नीरज नांगरे , ऍड.गोर्डे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *