मोहिनीराज

नेवासा | अभिषेक गाडेकर – सालाबाद प्रमाणे होणाऱ्या ग्रामदैवत मोहिनीराज यात्रा निमित्त नेवासे शहरात दि २८ फेब्रुवारी रामलीला मंगल कार्यालय येथे जिल्हा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन असो ऑफ बॉडी बिल्डिंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मयूर दरंदले यांनी केले आहे स्पर्धा 55, 60, 65, 70,75, किलो गटात घेण्यात येणार आहे.

स्पर्धेत विजेत्याने रोख रक्कम ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल स्पर्धेत सुमारे 1 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे स्पर्धा यशस्वी करण्या साठी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे अथक परिश्रम घेत आहेत. यावेळी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन असो ऑफ बॉडी बिल्डिंग सदस्य , मोहिनिराज देवस्थान कमिटी,यात्रा उत्सव कमिटी व समस्थ ग्रामस्थ यांनी केले आहे.

One thought on “नेवासा येथे जग प्रसिद्ध मोहिनीराज महाराज यात्रोत्सव निमित्त शरीर सौष्ठव स्पर्धा..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *