Crime News

Crime News : नगरमध्ये गावठी कट्टे विकायला आलेल्या ३ सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.१२) सकाळी ११.३० च्या सुमारास भिस्तबाग महालासमोर पाठलाग करून पकडले आहे.लखन भाऊसाहेब आल्हाट (वय ३२), लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे, अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट सर्व रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा अशी या आरोपींची नावे आहेत.(Crime News)

Crime News : नगरमध्ये गावठी कट्टे विकायला आलेल्या ३ सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.१२) सकाळी ११.३० च्या सुमारास भिस्तबाग महालासमोर पाठलाग करून पकडले आहे. त्यांच्या कडून एक गावठी कट्टा, २ काडतुसे आणि एक होंडा शाईन मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबतचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.हेमंत थोरात, स.फौ.भाऊसाहेब काळे, पो.ना.रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संदीप दरंदले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पो.कॉ. बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चालक स.फौ.उमांकात गावडे यांचे पथक तयार करुन तपास सुरु केला होता.

सदर पथक जिल्ह्यातील यापुर्वी अग्शिस्त्रे बाळगणारे इसमांचे रेकॉर्ड तपासुन अग्निशस्त्राची माहिती काढत असतांना पो.नि. दिनेश आहेर यांना सोमवारी सकाळी लखन भाऊसाहेब आल्हाट हा त्याचे साथीदारासह गावठी कट्टा आपले कब्जात बाळगुन ते विक्री करण्याचे उद्देशाने भिस्तबाग महालासमोर, सावेडी परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती त्यांनी पथकाला कळवून कारवाईसाठी पाठविले असताना या पथकाने लगेचच भिस्तबाग महाल, सावेडी परिसर या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले, त्यानंतर ११.३० वाजण्याच्या सुमारास ३ संशयीत इसम भिस्तबाग महालासमोर शाईन मोटारसायकलवर येऊन थांबले.

पथकातील अधिकारी व अंमलदार हे संशयीत इसमांना ताब्यात घेण्यासाठी जात असतांना त्या इसमांना पोलीस आल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडील मोटारसायकल चालु करुन ते पळुन जाऊ लागले यातच पथकाने त्यातील दोन इसमांना जागीच पकडले व एका इसमाचा पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले नंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा व २ काडतुसे आढळून आली.लखन भाऊसाहेब आल्हाट (वय ३२), लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे, अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट (सर्व रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा) अशी या आरोपींची नावे आहेत.

पकडलेले तिघेही सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, फसवणुक, दुखापत, विनयभंग, अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी गेल्या आठवडा भरात केलेली ही चौथी कारवाई आहे. या अगोदर शेंडी बायपास व नागरदेवळे शिवारात दोघांना पकडले होते. त्यानंतर सावेडी उपनगरातील गंगा उद्यान जवळ एकाला आणि आता भिस्तबाग महालाजवळ तिघांना पकडले आहे. या चार कारवायांमध्ये ५ गावठी कट्टे पोलिसांनी जप्त केले आहेत.

2 thoughts on “Crime News : गावठी कट्टे बाळगणारे नेवासा तालुक्यातील 03 सराईत आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *