Newasa News

Newasa News : नेवासा हे पवित्र स्थळ असून इतर तालुक्यांचे तुलनेत विकास कामा बाबतीत खूप मागे आहे. नेवासकरांच्या प्रलंबित प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागावे या मागणीसाठी १५ फेब्रुवारी रोजी नेवासकारांचे उपोषण.

Newasa News | अभिषेक गाडेकर : नेवासा हे पवित्र स्थळ असून इतर तालुक्यांचे तुलनेत विकास कामा बाबतीत खूप मागे आहे. वेळोवेळी विविध संघटना, नेवासकर नागरिक तहसील, नगर पंचायत, पंचायत समिती, पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्वांसह विविध विषयांवर निवेदन, आंदोलन, मोर्चे, वेळप्रसंगी भांडण होतील अश्या परिस्थितीत आंदोलन करत आले आहेत.

त्यामुळे यावेळी विविध विभागापैकी नगरपंचायत कडे, सर्व गावात सार्वजनिक शौचालय, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, ज्ञानेश्वर मंदिर कडे जाणारे रोडवरील अतिक्रमण, युवकांसाठी शासकीय उपलब्ध असणारे खेळाचे मैदान खुले व्हावे, गायरान मिळावे, शहीद स्मारक जागा मोकळी करून मिळावी, लेखापाल विभागात सीसीटिव्ही, नगरपंचायत मध्ये जास्तीत जास्त कर्मचारी नियुक्त व्हावे म्हणून पत्र व्यवहार होऊन ते पत्रका द्वारे जनतेला कळवावा.

दुय्यम निबंधक कार्यालय जेथे मोठ मोठे व्यवहार होतात अश्या ठिकाणी सामान्य जनतेला दस्त नोंदणीसाठी मानसिक व आर्थिक त्रास भोगावा लागतो त्यासाठी सीसीटिव्ही बसवण्यात यावे तसेच वकील संघाने केलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात ज्यामध्ये केलेल्या दस्तावर टाईप करणारे व दस्त नोंदवणार यांची सही घ्यावी अशी मागणी आहे. पोलीस निरीक्षक यांचे कडे विविध शाळा जवळ पोलिसांचा राऊंड व्हावा, सीसीटिव्ही पाहण्यासाठी कर्मचारी नेमावा, पोलिसांचे प्रलंबित वसाहत प्रश्नी व नवीन पोलीस स्टेशन कामी तूर्तातूर्त कागदोपत्री पत्रव्यवहार व्हावा ही विनंती करण्यात आली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी यांचे कडे आपला दवाखाना व्यवस्थित सुरू रहावा म्हणून बायोमेट्रिक हजेरी घ्यावी असे नमूद आहे.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कडे प्रवरा पात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी ईमेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे. अश्या अनेक मागण्यासाठी हे उपोषण होणार असून, यासाठी अनेक असंख्य युवकांचा व नागरिकांचे पाठिंबा पत्र आहे. याचा परिणाम ह्या सर्व अधिकारी वर्गावर होईल का ?याची वाट पूर्ण नेवासा तालुक्यासह नेवासा शहरातील नागरिक पाहत आहे.


One thought on “Newasa News : नेवासकरांच्या प्रलंबित प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागावे या मागणीसाठी १५ फेब्रुवारी रोजी नेवासकारांचे उपोषण.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *