पोलीस

नेवासा | अभिषेक गाडेकर – महापारेषणची विविंड करंजी डोंगर ते भेंडा दरम्याण 220 के व्ही. ची विद्युत वाहिणीचे काम सुरू अभियंत्यांना अटकाव केल्याने नेवासा पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबाबत दिपक कैलास सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महापारेषणची विविंड करंजी डोंगर ते भेंडा दरम्याण 220 के व्ही. ची विद्युत वाहिणीचे काम चालु आहे. सदरचे काम हे मा. उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग, अहमदनगर यांचे समोरील कामकाज तक्रार अर्ज 20/2021 अहमदनगर दि. 01/11/2021 अन्वये सुरु आहे.
सदर विद्युत वाहिणीचे दरम्याण येणारे शेती/जमीन मालक यांचा यापुर्वी सर्व्हे झाला असुन ज्यांचे शेतामधुन विज वाहक तारा तसेच मनोरा जाणार आहेत त्यांना विद्युत पारेषण कंपनीकडुन जमीनीचा व पिकाचे शासकिय नियमाप्रमाणे नुकसान भरपाई काहि शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. तसेच काही शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. त्याबाबत पंचनाम्याची कार्यवाही कंपनी मार्फत सुरु आहे.

सध्या महापारेषण कंपनीचे लाईनचे कामकाज रांजणगाव देवी ता. नेवासा जिल्हा अहमदनगर येथे मनोरा क्रमांक 112 ते 119 दरम्याण तारा ओढण्याचे काम चालु आहे. संबंधीत शेतकऱ्यांना यापुर्वी मनोरा पायाभरणी व उभारणी दरम्याण पिकाचे झालेल्या नुकासानीचे पंचनामा करुन नुकसान भरपाई दिलेली आहे. आता ते त्याबाबत वाढीव नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. त्याबाबत आम्ही त्यांना तुम्हाला शासकिय नियामाप्रमाणे नुकसान भरपाई दिलेली आहे व उर्वरीत लाईनचे काम पूर्ण झाले नंतर शासकिय नियमाप्रमाणे तुम्हाला नुकसान भरपाई देण्यात येईल असे वेळोवेळी सांगीतले होते. संजय बंडु ठुबे व कमलेश नवले दोघे रा. सौंदाळा हे वेळोवेळी आम्हाला कामकाजात अटकाव करत असतात.

आज दि. 12/02/2024 रोजी सदर लाईनचे कामकाजाकरीता शासकिय नियमाप्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन येथे सशुल्क पोलीस बंदोबस्त घेवुन तारा ओढणीचे काम चालु होते. त्यावेळी तेथे मी तसेच महापारेषण कंपनीचे आकाश शंकर हुच्चे (सहाय्यक अभियंता), संतोष दगडु लांडे (सहाय्यक तंत्रज्ञ), रोहित राजेंद्र नागपुरे (तंत्रज्ञ), प्रकाश कश्यप, सतिष ठोके, विजय दंभाडे, शिमोन घोरपडे, नेवासा पोलीस स्टेशन येथील पोलीस स्टाफ, तलाठी व मंडळ अधिकारी यांचे उपस्थीतीत तारा ओढण्याचे काम चालु असताना दु 03/30 वा. चे सुमारास तेथे संजय बंडु ठुबे, कमलेश नवले, दत्तात्रय भाऊसाहेब पंडित सर्व रा. सौदाळा तसेच स्थानिक शेतकरी तुकाराम भानुदास पेहरे, लक्ष्मण कचरु पेहरे, रामभाऊ कचरु पेहरे, अमोल चौधरी,

निलेश शिंदे सर्व रा. रांजणगाव देवी ता. नेवासा व इतर चार ते पाच अनोळखी इसम असे येवुन तुम्ही उर्वरीत कामाचा आर्थिक धनादेश आम्हाला कधी द्याल ते लिहून द्या असे म्हणाल्याने आम्ही लगेच आमचे वरीष्ठांशी बोलणे करुन तेथील शेतकरी व महापारेषण प्रतिनिधी यांचेशी चर्चा करुन शेतकरी यांना 1) तारा पसरवताना होणारे पिकांचे नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्यात येतील व संबंधित पंचनाम्यात नमुद केलेल्या नुकसान भरपाईचे धनादेश संबंधित शेत मालकाला दिल्यानंतर तारा ओढण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच

2) विद्युत वाहिनीचे मनोऱ्या खालील व्यापलेली जागा व तारेखालील जागेची नुकसान भरपाई शासन नियमानुसार मोजणी करुन प्रस्तावाप्रमाणे मुल्यांकन करुन मोबदला निश्चीत करण्यात येईल अशा आशयाचे पत्र बनवुन त्यांना दाखवले असता त्यांनी ते आम्हांला मान्य नसुन आम्हाला मोबदला भेटल्याशिवाय काम करुन देणार नाही असे म्हणुन आमचे जाणे येण्याचे रोडमध्ये हिरव्या रंगाचा “सहारा ट्रेलर” असे मराठीत नाव असलेली ट्रॉली आडवी लावुन आमचेवर दबाव आणण्यासाठी त्यातील दोघांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डींग करून आमचे कामकाजात अटकाव करुन शासनाचे आदेशाचे उल्लंघन केले आहे. म्हणुन माझी 1. संजय बंडु ठुबे 2. कमलेश नवले 3. दत्तात्रय भाऊसाहेब पंडित सर्व रा. सौदाळा 4. तुकाराम भानुदास पेहरे 5. लक्ष्म कचरु पेहरे 6. रामभाऊ कचरु पेहरे 7. अमोल चौधरी 8. निलेश शिंदे सर्व रा. रांजणगाव देवी ता. नेवासा व इतर चार ते पाच अनोळखी इसम यांचे विरुध्द तक्रार आहे.

One thought on “महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या विद्युत तारा ओढताना अभियंत्यांना अटकाव केल्याने नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *