Bailgada Sharyat

Bailgada Sharyat : माननीय न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीला(Bailgada Sharyat) हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील कासेगाव मध्ये या बैलगाडा शर्यतीचे थाटात आयोजन केले जाणार आहे.

Bailgada Sharyat : माननीय न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केल्या जात आहेत. बैलगाडा शर्यतीचा हा खेळ तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात फार पूर्वीपासून खेळला जात आहे. मात्र या खेळात होणाऱ्या अपघाताच्या घटना पाहता या खेळाला माननीय न्यायालयाने बंदी घातली होती. मात्र न्यायालयाने ही बंदी उठवल्यानंतर या खेळाचे पूर्वीप्रमाणेच थाटात आयोजन केले जात आहे. दरम्यान याच बैलगाडा शर्यती बाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

ही बातमी राज्यातील बैलगाडा मालकांसाठी खूपच कामाची राहणार आहे. कारण की महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी बैलगाडा शर्यत(Bailgada Sharyat) आयोजित केली जाणार आहे ज्यामध्ये बक्षीस म्हणून बैलगाडा मालकाला वन बीएचके फ्लॅट दिला जाणार आहे. यामुळे सध्या या बैलगाडा शर्यतीची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील कासेगाव मध्ये या बैलगाडा शर्यतीचे थाटात आयोजन केले जाणार आहे. ही शर्यत राष्ट्रवादीचे नेते ( शरद पवार यांचा गट ) जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केली जाणार आहे. या बैलगाडा शर्यतीला जयंत केसरी बैलगाडा शर्यत असे नाव देण्यात आले आहे. या बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम विजेत्या बैलगाडा मालकाला वन बीएचके फ्लॅट दिला जाणार आहे. एवढेच नाही तर दुसऱ्या आणि तिसऱ्या विजेत्याला देखील या शर्यतीत मोठी रक्कम भेट म्हणून मिळणार आहे.या बैलगाडा शर्यतीत दुसऱ्या विजेत्याला सात लाख रुपये आणि तिसऱ्या विजेत्याला पाच लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा मालकांमध्ये याच शर्यतीची चर्चा पाहायला मिळत आहे.

या शर्यतीसाठी तब्बल दहा एकर जागेवर मैदान तयार केले जाणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लाहीगडे फाउंडेशन कडून याचे आयोजन करण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने 17 फेब्रुवारी 2024 ला ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीला 10 एकरावर मैदान तयार केले जात असून येथे तब्बल एक लाख प्रेक्षक उपस्थित राहतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या शर्यतीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यातील बैलगाडा मालक सहभाग नोंदवणार अशी माहिती समोर येत आहे. या स्पर्धेत जवळपास 200 बैलगाडा मालक भाग घेणार आहेत. खऱ्या अर्थाने हा सोहळा, स्पर्धा खूपच नेत्र दीपक राहणार आहे.

यात पहिल्या क्रमांकावर विजेत्या ठरणाऱ्या बैलगाडा मालकाला 20 लाख रुपयांचा फ्लॅट बक्षीस म्हणून दिला जाणार आहे. यामुळे सर्वांनाच या बैलगाडा शर्यतीची आतुरता लागली आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यासह अख्या महाराष्ट्राचे या बैलगाडा शर्यतीकडे विशेष लक्ष राहणार आहे. ही महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी बैलगाडा शर्यत राहील असा दावा देखील आयोजकांकडून केला जात आहे.

One thought on “Bailgada Sharyat : महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत, बक्षीस म्हणून मिळणार 1 बीएचके फ्लॅट..”
  1. […] Bailgada Sharyat : महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलग… नेवासा येथे जग प्रसिद्ध मोहिनीराज महाराज यात्रोत्सव निमित्त शरीर सौष्ठव स्पर्धा.. […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *