भास्करगिरी

नेवासा | सुधीर चव्हाण – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील गोदातीरी असलेल्या घटेश्वर मंदिर विकासाचे काम वेगाने सुरू असून यासाठी येथील देवरे परिवराच्या वतीने पाच हजाराची आर्थिक मदत करण्यात आली सदरची मदत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते मंदिर विकास कमिटीकडे  सुपूर्त करण्यात आली.  देवरे वस्तीवरील श्री संत पुंजाई माता पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांनी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत भेट दिली असता संत सेवक शंकरराव देवरे सरांनी आपल्या परिवाराच्या वतीने सदरची रक्कम श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते परीसर विकास कमिटीकडे सुपूर्त केली. गोदातीरी असलेल्या घटेश्वर मंदिर परिसर विकास कामांसाठी प्रवरासंगम येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन परिसर विकास समिती स्थापन केल्याबद्दल गुरुवर्य बाबाजींनी समाधान व्यक्त केले.

यावेळी घटेश्वर मंदिर परिसर विकास समितीच्या वतीने बी.के.चव्हाण, सोसायटीचे चेअरमन पांडुरंग काळे, उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या गौरीताई शंकरराव  देवरे व शंकरराव बाबुराव देवरे सर यांचा  गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा यांनी घटेश्वर मंदिर परिसरातील वैकुंठ धाम दुर्लक्षित होते ते काम ही हाती घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले चांगले काम करत राहा,भगवंत पूर्तता करत राहील असा शुभाशीर्वाद त्यांनी यावेळी बोलताना दिला.तर देणगीदार शंकरराव देवरे सर यांनी घटेश्वर अमरधाम भूमीमध्ये फळाफुलांची झाडे लावा येथील वातावरण व परिसर सुगंधित करा असे आवाहन यावेळी बोलताना केले. 

यावेळी हभप बाबासाहेब महाराज जाधव,पांडुरंग काळे,बी के चव्हाण,मुरलीधर पुलाटे,उद्योजक दिनकरराव कदम,सुखदेव देवरे,ईश्वरभाऊ देवरे,कैलासभाऊ देवरे उपस्थित होते.यावेळी घटेश्वर मंदिर परिसर विकसित करण्यासाठी दात्यांनी बीके चव्हाण प्रवरा संगम 79 72 56 87 12 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात यावा व आर्थिक मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *