Crime News

Crime News – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे शेतीच्या वादावरून मारहाण करत जखमी केल्याची घटना वंजारवाडी येथे घडली आहे.

Crime News | गणेश बेल्हेकर – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे शेतीच्या वादावरून मारहाण करत जखमी केल्याची घटना वंजारवाडी येथे घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती वरुन दि. ६ फ्रेबुरवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आदिनाथ नवनाथ दहिफळे हा आपल्या शेतात गवत कापण्यासाठी गेला असता आरोपी शिवाजी गेनू डोळे, रामा शिवाजी डोळे यांनी पाईपलाईन शेतीच्या बांधाच्या कारणावरून हातातील लोखंडी राॅडने व कुऱ्हाडी ने मारहाण करत जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली .

आदिनाथ नवनाथ दहिफळे यांचे फिर्यादी वरुन वरील आरोपी विरूध्द सोनई पोलीस ठाण्यात भादवी कलम ३२४,३२३,५०४,५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पो .हे.काॅ. एच तमनर हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *