घोडेगाव | दादा दरंदले : घोडेगाव रस्त्यावरील शनिशिंगणापूरच्या तळ्यात गुरुवारी दिनकर सोमाजी जोगदंड, वय ३२, पानसवाडी, ता. नेवासे यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तो घरातून निघून गेला होता. त्याने तळ्यात उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी मृताची बहीण वंदना सोमाजी जोगदंड, रा. पानसवाडी, ता. नेवासे यांच्या खबरीवरून सोनई पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली.

त्याचा मृतदेह नेवासे ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. सोनईचे सपोनि आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र अडकित्ते व पोलिस नाईक एस. ए. झांबरे पुढील तपास करत आहेत.

One thought on “32 वर्षीय तरुणाची शनीशिंगणापूरच्या साठवण तळ्यात आत्महत्या..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *